Advertisement

४ सरकारी बँकांचं होणार खासगीकरण

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. सरकारच्या महसूली उत्पन्नात मोठी घट झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने चार बँकांमधील आपली हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे.

४ सरकारी बँकांचं होणार खासगीकरण
SHARES

केंद्र सरकारने बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब आणि सिंध बँक, आयडीबीआय आणि युको बँक या चार सरकारी बँकांचं खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मार्चपर्यंत सरकार या बँकांमधील आपला हिस्सा विकून निधी उभारणार आहे.

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. सरकारच्या महसूली उत्पन्नात मोठी घट झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने चार बँकांमधील आपली हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे. काही अन्य बँकांमध्येही सरकारी हिस्सेदारी विकली जाऊ शकते. सरकार नेमका किती हिस्सा विकणार आहे, हे मात्र स्पष्ट झालेलं नाही

पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक आणि आयडीबीआय या सरकारी बँकांसह अनेक सरकारी बँका थकीत कर्जाची वसुली करण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे सरकार या बँकांचे खासगीकरण करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, निधी गोळा करण्यासाठी सरकार बँकांमधील आपला हिस्सा विकणार असल्याचं कळतं. पंतप्रधान कार्यालयाने त्याबाबतचं पत्र वित्त मंत्रालयाला पाठवलं आहे. या आर्थिक वर्षात चारही बँकांची खासगीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यास त्यांनी सांगितलं आहे. मात्र, केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

काही सरकारी समित्या आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशात केवळ ५ सरकारी बँका ठेवाव्यात असा सल्ला सरकारला दिला आहे. त्यामुळे सरकारने या बँकांच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्यावर्षी सरकारने १० बँकांचे विलिनीकरण केलं. त्यामुळे सध्या देशात १२ सरकारी बँका आहेत. २०१७ पर्यंत देशात २७ सरकारी बँका होत्या.



हेही वाचा -

एसबीआयची ४४ कोटी ग्राहकांना खूशखबर, घेतला 'हा' निर्णय

६ महिन्यांसाठीही 'या' बँकांत करता येणार एफडी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा