Advertisement

एसबीआयची ४४ कोटी ग्राहकांना खूशखबर, घेतला 'हा' निर्णय

कोरोना काळात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात या निर्णयाचा फायदा एसबीआयच्या ४४ कोटी हून अधिक ग्राहकांना होणार आहे.

एसबीआयची ४४ कोटी ग्राहकांना खूशखबर, घेतला 'हा' निर्णय
SHARES

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना यापुढे खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागणार नाही. ग्राहकांनी जर त्यांच्या खात्यात किमान रक्कम ठेवली नाही तर त्यांना कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. तसंच एसबीआय ग्राहकांकडून एसएमएस शुल्कही आकारणार नाही. बँकेच्या सर्व बचत खाते धारकांना हा नवीन नियम लागू होणार आहे.

कोरोना काळात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात या निर्णयाचा फायदा एसबीआयच्या ४४ कोटी हून अधिक ग्राहकांना होणार आहे. बँकेने मेट्रो शहरातील खातेधारकांना किमान शिल्लक रक्कमेची मर्यादा ३ हजार रुपये, छोट्या शहरासाठी २ हजार रुपये तर ग्रामीण भागासाठी १ हजार रुपये इतकी ठेवली होती. आता ती हटवण्यात आली आहे. 

एसबीआयने एटीएममधून १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्याच्या नियमात बदल केले आहे. जर तुम्ही १० हजारांपेक्षा अधिक रक्कम काढणार असाल तर तुम्हाला ओटीपी द्यावा लागेल. बँकेच्या या सुविधेअंतर्गत खातेधारकांना रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी टाकावा लागेल. 

बँकेच्या ज्या बचत खातेधारकांकडे इंटरनेट बँकिंग आणि चेक बुकची सुविधा आहे त्यांचे देखील शुल्क माफ करण्यात आलं आहे. एटीएममधील व्यवहारही अमर्यादित केले आहे. जे खातेधारक महिन्याला १ लाखापेक्षा अधिक इतकी रक्कम किमान शिल्लक रक्कम ठेवतात त्यांना एटीएमद्वारे केलेल्या व्यवहारांना शुल्क द्यावे लागणार नाही. अशा खातेधारकांना अमर्यादीत एटीएम व्यवहार करता येईल.हेही वाचा -

६ महिन्यांसाठीही 'या' बँकांत करता येणार एफडी

६ महिन्यांसाठीही 'या' बँकांत करता येणार एफडी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा