Advertisement

६ महिन्यांसाठीही 'या' बँकांत करता येणार एफडी

आपल्याला जर दीर्घ काळासाठी बँकेच्या निश्चित ठेवीमध्ये गुंतवणूक करायची नसेल तर बँका अल्प मुदतीसाठीदेखील एफडी करण्याची सुविधा देतात.

६ महिन्यांसाठीही 'या' बँकांत करता येणार एफडी
SHARES

आपल्याला जर दीर्घ काळासाठी बँकेच्या निश्चित ठेवीमध्ये गुंतवणूक करायची नसेल तर बँका अल्प मुदतीसाठीदेखील एफडी करण्याची सुविधा देतात. ग्राहक दिवस ते महिन्यांच्या कालावधीसाठी देखील एफडी उघडू शकतात. ही एफडी देशातील कोणत्याही बँकेत उघडता येते.

भारतीय स्टेट बँक,एचडीएफसी बँक, आयसीआयसी बँक, आयडीबीडीआय बँक, पीएनबी यासारख्या देशातील प्रमुख बँका दिवस ते महिने मुदतीच्या एफडीची सुविधा देतात. अशा परिस्थितीत आपण आपले पैसे इतरत्र गुंतवणूक करत नसल्यास बचत खात्यात निष्क्रिय राहण्याऐवजी आपण अल्प मुदतीच्या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. 

 

एसबीआय 

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) मध्ये ग्राहकांना २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ६ महिने मुदतीच्या एफडीवर ४.४० टक्के व्याज दिलं जातं. ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये ४.९० टक्के व्याज मिळणार आहे. तर २ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या एफडीवर २.९० टक्के व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ३.४० टक्के व्याज मिळेल.

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँकेत २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ६ महिन्यांच्या एफडीवर ४.१० टक्के व्याज मिळेल. या मुदतीच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ४.६० टक्के व्याज मिळेल. तर २ ते ५ कोटींच्या एफडीवर ३.५० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ४ टक्के व्याज मिळेल. 

पीएनबी बँक 

पंजाब नॅशनल बँकेत २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ६ महिने मुदतीच्या एफडीवर ४.५० टक्के व्याज मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना ५.२५ टक्के व्याज मिळणार आहे. २ ते १० कोटींच्या एफडीवर ३.२५ टक्के व्याजदर आहे.

आयसीआयसीआय

आयसीआयसीआय बँकेत प्रीमॅच्युअर विड्राॅवल फॅसिलीटी असलेल्या स्कीममध्ये २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ६ महिन्याच्या एफडीवर ४.२५ टक्के व्याज मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ४.७५ टक्के व्याज मिळणार आहे. ५ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर ३.५० टक्के व्याज मिळेल. 



हेही वाचा -

व्हॉट्सअ‍ॅपने घरबसल्या करा बँकिंग कामे, 'अशी' आहे व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सुविधा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा