हृदयद्रावक घटना : आई पाठोपाठ पोलिसाचाही कोरोनाने मृत्यू

राज्य पोलिस दलातील मृतांचा आकडा १८४ वर पोहोचला आहे. महिन्याभरात दोनवेळा दिवसाला पाचशेहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

हृदयद्रावक घटना : आई पाठोपाठ पोलिसाचाही कोरोनाने मृत्यू
SHARES

कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, हातावर पोट असलेल्यांना वणवण भटकण्याची वेळ आली, नाती दूरावली, तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. अशीच एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. आईच्या मृत्यूनंतर सशस्त्र पोलिस दलात कार्यरत मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मुंबईत घडली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्य पोलिस दलातील मृतांचा आकडा १८४ वर पोहोचला आहे. महिन्याभरात दोनवेळा दिवसाला पाचशेहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचाः- मनसेच्या पुढाकारामुळे १,१९,७४३ रिक्षामालकांना आर्थिक दिलासा

या महिन्यात राज्य पोलिस दलातील कोरोनाने उच्चांक गाठला आहे. महिन्याभरात दोनवेळा दिवसाला पाचशेहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्य पोलिस दलातील बाधीत पोलिसांचा आकडा १८ हजार २१६ वर पोहोचला आहे. त्यातील १४ हजार ४५६ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील २४४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय गेल्या २४ तासांत राज्यात तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात मुंबई, परभणी व अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांचा समावेश आहे. याशिवाय सोमवारी सांगली जिल्ह्यातील एका पोलिसांचा मृत्यूचा समावेशही गुरूवारी यादीत करण्यात आल्याचे पोलिस अधिका-याने सांगितले.

हेही वाचाः- डॉ. बाबासाहेब स्मारकाच्या खर्चात इतकी वाढ

मुंबईतील सर्वाधीत बाधीत पोलिस असलेल्या सशस्त्र पोलिस दलातील विकास कृष्णा कांबळे(५३) या पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते वरळी येथील एलए-३ मध्ये कार्यरत होते. पोलिस नाईक कांबळे यांना रक्तदाब व मधुमेहाचाही त्रास होता. त्याचे वय व आजार पाहता त्यांना कर्तव्यावर हजर न राहण्याची मुभा देण्यात आली होती. २४ ऑगस्टला त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. तेव्हापासून ते बांद्रा कुर्ला संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होते. बुधवारी पहाटे दोनच्या सुमासार त्यांचा मृत्यू झाला. ते अत्यंत कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी होते. दुर्दैवाची बाब म्हणून काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक(एलए-३) मिलींद इडेकर यांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना लवकरच उपचारानंतर घरी पाठवण्यात येणार आहे.

हेही वाचाः- आणखी एका बँकेत घोटाळा, मुंबईत सीबीआयचे चार ठिकाणी छापे

परभणीतील पोलिस नाईक रामलीन मन्मत स्वामी(५२) यांचाही कोरोनामुळे बुधवारी मृत्यू झाला आहे. ते जिन्तूर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. ते कार्यतत्पर होते, तसेच कधीत विनाकारण सुटी घ्ययचे नाही. परभणीतील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या स्वामी यांच्या प्रृकृतीत सुधार झाला नाही. त्यामुळे त्यांना ७ सप्टेंबरला औरंगाबाद येथील बजाज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वामी यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे असा परिवार आहे. अहमद नगर येथील रहिम शौकत खान या हवालदाराचाही कोरोनाामुळे मृत्यू झाला आहे. ते मोटर ट्रान्सपोर्ट विभागात कार्यरत होते. ते घरातील बाथरुममध्ये पडल्यामुळे त्यांना रु्गणालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. मुंबई पोलिस दलातील कोरोनाबाधीत पोलिसांचा आकडा पाच हजारांवर पोहोचला आहे. तर ७२ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई पाठोपाठ ठाण्यात सर्वाधीक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा