आणखी एका बँकेत घोटाळा, मुंबईत सीबीआयचे चार ठिकाणी छापे

बँकेच्या तक्रारीनुसार कंपनीचे आरोपी पदाधिकारी, हमीदार यांनी आपापसात संगनमत करून कर्ज घेतले. कर्जाची रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा झाल्यानंतर ती प्रवर्तक व त्यांच्या कुटुंबियांच्या खात्यावर वळती केली

आणखी एका बँकेत घोटाळा, मुंबईत सीबीआयचे चार ठिकाणी छापे
SHARES

मुंबईत पीएनबी घोटाळ्यानंतर एकच खळबळ उडाली असताना, मुंबईतल्या आणखी एका बँकेत १०३ कोटीचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एका कंपनीच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरूवारी सीबीआयने या प्रकरणी मुंबईत चार ठिकाणी छापेमारीही केली आहे.

हेही वाचाः- डॉ. बाबासाहेब स्मारकाच्या खर्चात इतकी वाढ

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) ने कंपनीचे चेअर-कम-मॅनेजिंग डायरेक्टर कपिल पुरी आणि इतर आरोपींचे निवासस्थान व सायन वेस्ट, मुंबई येथील कंपनीच्या कार्यालयाची झडती घेतली. या प्रकरणात पुरीची पत्नी कविताही देखील आरोपी आहे. कंपनीसह तिच्या चार पदाधिका-याविरोधातही गुन्हा दाखल कण्यात आला आहे. सेंट्रल बँकेच्या तक्रारीनुसार कंपनीचे आरोपी पदाधिकारी, हमीदार यांनी आपापसात संगनमत करून कर्ज घेतले. कर्जाची रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा झाल्यानंतर ती प्रवर्तक व त्यांच्या कुटुंबियांच्या खात्यावर वळती करण्यात आली. त्यातून सेंट्रल बँकेला १०३ कोटी २७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचाः- मनसेच्या पुढाकारामुळे १,१९,७४३ रिक्षामालकांना आर्थिक दिलासा

सेंट्रल बँकेच्या झालेल्या नुकसानी प्रकरणी सीबीआयने मुंबईत चार ठिकाणी शोध मोहिम राबवली आहे. त्यात कार्यालय, आरोपींची घरे, कंपनी यांचा समावेश आहे. या शोध मोहिमेत महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळाल्याचा दावा सीबीआयने केला आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा