Advertisement

डॉ. बाबासाहेब स्मारकाच्या खर्चात इतकी वाढ


डॉ. बाबासाहेब स्मारकाच्या खर्चात इतकी वाढ
SHARES

मुंबईतील दादर येथील इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी लागणार खर्चही ठरवण्यात आला होता. परंतु, आता या स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यात आल्यानं सुमारे ३०० कोटी रुपयांनी खर्च वाढला आहे. 

स्मारकाच्या सुधारित खर्चास राज्य सरकारने गुरुवारी मान्यता दिली आहे. सुधारित संकल्पनेनुसार आंतरराष्ट्रीय स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकूण १३६.६८ मीटर (४५० फूट) उंच पुतळा असनार आहे. त्यात पॅडस्टल ३० मीटर (१०० फूट) असून निव्वळ पुतळ्याची उंची १०६.६८ मीटर (३५० फूट) असणार आहे. पुतळ्याची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी केली होती. 

या मागणीप्रमाणे पुतळ्याची उंची वाढण्यात आली आहे. पूर्वी आंबडेकर स्मारकाचा खर्च ७६३ कोटी पाच लाख इतका होता. आता तो १ हजार ८९ कोटी ९५ लाखावर गेला आहे. या स्मारकासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) हे नियोजन प्राधिकरण आहे. सल्लागार वास्तुविशारद शशी प्रभू असून एल अँड टी कंपनी कंत्राटदार कंपनी आहे.

सामाजिक न्याय विभाग या स्मारकाच्या खर्चाची प्रतिपूर्ती करणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे राज्याची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे स्मारक नियोजित वेळेत पूर्ण नाही झाल्यास खर्चात आणखी वाढ होऊ शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा