Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

पीएनबीमध्ये आणखी एक घोटाळा, डीएचएफएलकडून ३६८८ कोटींची फसवणूक

हिरे व्यापारी नीरव मोदीने तब्बल १३ हजार कोटी रुपये बुडवल्यानंतर आता पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) पुन्हा एकदा मोठ्या घोटाळ्याला सामोरं जावं लागलं आहे.

पीएनबीमध्ये आणखी एक घोटाळा, डीएचएफएलकडून ३६८८ कोटींची फसवणूक
SHARES

हिरे व्यापारी नीरव मोदीने तब्बल १३ हजार कोटी रुपये बुडवल्यानंतर आता पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) पुन्हा एकदा मोठ्या घोटाळ्याला सामोरं जावं लागलं आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) या कंपनीला दिलेल्या ३६८८ कोटी रुपयांच्या कर्जात बँकेची फसवणूक झाली आहे. पीएनबीने रिझर्व्ह बँकेला या घोटाळ्याची माहिती दिली आहे.


डीएचएफएलने पीएनबीकडून घेतलेल्या ९७ हजार कोटी रुपयांच्या कर्जांपैकी ३१ हजार कोटी रुपये बनावट कंपन्यांच्या माध्यमातून घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. पीएनबीने रिझर्व्ह बँकेला सादर केलेल्या अहवालात दिवाण हौसिंगच्या कर्ज खात्यात ३६८८.५८ कोटींची फसवणूक झाली असल्याचं म्हटलं आहे. तसंच यासाठी बँकेने १२४६.५८ कोटींची तरतूद केली असल्याचंही म्हटलं आहे. 


नॉन-बँकिंग फायनान्शिल कंपनी असणारी डीएचएफएलवर सध्या दिवाळखोरीत असून कंपनीवर ८५ हजार कोटींचे कर्ज आहे. डीएचएफएल च्या बँक खात्यांची आणि कर्जाची विविध तपास यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. बनावट कंपन्या भासवून दिवाण हौसिंगने बँकांकडून हजारो कोटींची कर्जे घेतली आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँकेने याआधीच डीएचएफएलचे खाते फसवे घोषित केले आहे.  


येस बँक आणि डीएचएफएल या प्रकरणात नुकतंच सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं आहे. येस बँकेने दिलेल्या कर्जाऊ रक्कमेचा गैरवापर करतानाच डीएचएफएलने हे कर्ज बुडवले. याबद्दल येस बँकेचे संस्थापक राणा कपूर व डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवान यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.  रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २०१९ मध्ये डीएचएफएलचे संचालक मंडळ बरखास्त केले होते.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा