Advertisement

पीएनबी, कॅनरा, युनायटेड, युनियनसह १० बँकांचं होणार विलीनीकरण, निर्मला सीतारमण यांची घोषणा

केंद्र सरकारने शुक्रवारी बँकिंग क्षेत्रासाठी मोठा निर्णय घेतला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १० बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली. १० बँकांचं विलीनीकरण होऊन ४ मोठ्या बँका बनणार आहेत.

पीएनबी, कॅनरा, युनायटेड, युनियनसह १० बँकांचं होणार विलीनीकरण, निर्मला सीतारमण यांची घोषणा
SHARES

केंद्र सरकारने शुक्रवारी बँकिंग क्षेत्रासाठी मोठा निर्णय घेतला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १० बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली. १० बँकांचं विलीनीकरण होऊन ४ मोठ्या बँका बनणार आहेत. या बँकांचा एकूण व्यवसाय ५५.८१ लाख कोटी रुपये असणार आहे. या निर्णयामुळे देशातील बँकांची संख्या आता १२ असेल.

यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारमण यांनी म्हटलं की, विलीनीकरण केल्यामुळे बँकांच्या कर्ज देण्याची क्षमता वाढेल आणि त्यांचा ताळेबंद मजबूत होईल. बँकाना आंतरराष्ट्रीय आकाराचे बनवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर नेण्यासाठी आम्ही कसोशीचे प्रयत्न करतो आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.


या बँकांचं विलीनीकरण

  • पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), ओरियंटल बैंक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक यांचं विलीनकरण होऊन पंजाब नॅशनल बँक ही देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकांची बँक बनणार आहे. विलीनीकरणानंतर या बँकेकडे १७.९५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय असेल. या बँकेच्या ११ हजार ४३७ शाखा असतील.
  • कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचं विलीनीकरण होऊन देशातील सर्वात मोठी चौथी बँक बनणार. या बँकेकडे १५.२० लाख कोटी रुपयांचा व्यवसाय असेल.
  • युनियन बँक, आंध्रा बँक आणि काॅर्पोरेशन बँकेचं विलीनीकरण होऊन पाचवी मोठी बँक बनणार. या बँकेकडे १४.५९ कोटी रुपयांचा व्यवसाय असेल
  • इंडियन बँक आणि अलाहाबाद बँकेच्या विलीनीकरणानंतर सातवी मोठी बँक तयार होईल. या बँकेचा ८.०८ लाख कोटींचा व्यवसाय असेल.


बँकांना हजारो कोटींची मदत

बँकांच्या सुदृढीकरणासाठी सरकार त्यांच्यामध्ये हजारो कोटींचं भांडवल ओतणार असल्याचं अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे. यानुसार पीएनबीला १६ हजार कोटी रुपयेयुनायटेड बँकेला १६०० कोटी रुपये, युको बँकेला २१०० कोटी रुपयेइंडियन ओवरसीज बँकेला ३८०० कोटी रुपये, इंडियन बँकेला २५०० कोटी रुपये, बँक आॅफ बडोदाला ७ हजार कोटी रुपये, युनियन बँकेला ११ हजार ७०० कोटी रुपये आणि कॅनरा बँकेला ६५०० कोटी रुपये मिळणार आहेत.


आता या असतील १२ सरकारी बँका

) स्टेट बँक  आॅफ इंडिया

) पंजाब नेशनल बँक

) बँक ऑफ बडोदा

) कॅनरा बँक

) युनियन बँक ऑफ इंडिया

) बँक ऑफ इंडिया

) अलाहाबाद बँक

) सेंट्रल बँक ऑफ इंडिया

) इंडियन ओवरसीज बँक

१०) यूसीओ बँक

११) बँक ऑफ महाराष्ट्र

१२) पंजाब आणि सिंध बैंक




   

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा