सुशांत आत्महत्या प्रकरण! म्हणून सुशांतचा विसेरा रिपोर्ट पुन्हा तपासणार

. या हाय प्रोफाइल प्रकरणात असे अनेक पैलू आहेत, जे तपासणी दरम्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. पण सर्वात महत्वाचे म्हणजे सुशांतचा विसेरा रिपोर्ट, सुशांतचा विसेरा रिपोर्ट आता पून्हा एकदा तपासल जाणार आहे.

सुशांत आत्महत्या प्रकरण! म्हणून सुशांतचा विसेरा रिपोर्ट पुन्हा तपासणार
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. सीबीआयची एसआयटी टिम या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सुशांतचा मृत्यू कसा झाला. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सीबीआय टीम एम्सच्या डॉक्टरांची मदत घेत आहे. या हाय प्रोफाइल प्रकरणात असे अनेक पैलू आहेत, जे तपासणी दरम्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. पण सर्वात महत्वाचे म्हणजे सुशांतचा विसेरा रिपोर्ट, सुशांतचा विसेरा रिपोर्ट आता पून्हा एकदा तपासल जाणार आहे.

हेही वाचाः- ईडीचा चंदा कोचर यांना दणका, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पतीला अटक

सुशांत आत्महत्येला दोन महिने उलटले मात्र त्याच्या आत्महत्ये मागील कारण आजही गुलदस्त्यात आहेत. या प्रकरणात आता सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाशी संबधित सर्वाशी सीबीआय चौकशी करत आहेत. मागील तीन दिवसात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तीन ते चार वेळा सुशांतच्या घरी तपासासाठी गेले होते. त्याठिकाणी सीबीआयने आत्महत्यचे रिएक्शनही करून पाहिले. या रिएक्शनमध्ये सुशांतच्या वजनाचा पुतळा त्याने गळफास घेतलेल्या ठिकाणी अडकवून पाहिला, तर त्याने ज्या वेळी आत्महत्या केली. त्यावेळी घरात उपस्थित असलेला सिद्धार्थ पठानी, कूक निरज आणि चावी बनवण्याची चौकशी करण्यात आली. तर दुसरीकडे अंमली पदार्थ प्रकरणात एनसीबीने शौविक चक्रवर्ती, सुशांत सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांना अटक करण्यात आली.

हेही वाचाः-सुशांत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस तोंडघशी, तपास सीबीआयकडे

सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिस करत असताना. त्यांनी सुशांतचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयात केले. ते शवविच्छेदन करणाऱ्या पाच डाॅक्टरांनी केलेले आरोपामुळे मुंबई पोलिसांच्या अडचणीत आधीच वाढ झालेली आहे. डाँक्टरांनी केलेल्या आरोपानुसार पोलिसांनीच रात्री उशिरा आणि लवकरात लवकर शवविच्छेदन करण्यास सांगितल्याचा खुलासा केला आहे. तर सुशांतचा व्हिसेरा कलीना येथील न्याय वैद्यक प्रयोग शाळेत पाठवण्यात आला होता. त्यातील ८० टक्के नमुने मुंबई पोलिसांनी तपासासाठी वापरले असल्याचे न्याय वैद्यकिय प्रयोग शाळेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे २० टक्के नमुन्याच्या आधारे आता सीबीआयच्या अधिकाऱ्यांना तपास करावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हा विसेरा तपासताना या पूर्वी  मुंबई पोलिसांनी करण्यात आलेल्या विसेरा चाचणीतील साम्यही सीबीआय पडताळून पाहणार आहेत.

विसेरा रिपोर्ट म्हणजे काय,  ते कसे तपासले जाते.

एखाद्याच्या मृत्यूनंतर जर पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले तर या दरम्यान मृत शरीराच्या आतील भाग, आतड्यांसंबंधी, हृदय, मूत्रपिंड, यकृत इत्यादींचा नमुना घेतला जातो. त्याला व्हिसरा म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूमागील पोलिस किंवा कुटूंबाबद्दल कोणत्याही प्रकारची शंका असल्यास, अशा घटनांमध्ये विस्राचा मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास केला जातो. विसेराची तपासणी ही न्यायवैद्यक प्रयोग शाळेतील अधिकारी करतात. ते विसेरा शोधण्याचा आणि मृत्यू कसा झाला, त्यामागील कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न करतात. या तपासणीत, मृत्यूची वेळ, शरीराच्या अंतर्गत अवयवांचा रंग, नसा संकुचित होणे, पोटात सापडलेल्या अन्नाचे अवशेष अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून, विसेरा तपासणीत मृत्यूचे कारण स्पष्टपणे ठाऊक होते. हा विसेरा अहवाल न्यायालयात पुरावा म्हणून सादर केला जातो. संशयास्पद परिस्थितीत मृत्यू, गोळीबार करून मृत्यू, विष देऊन मारणे, गळा दाबून मारणे, बलात्कारानंतर मृत्यू, बुडल्याने मृत्यू किंवा इलेक्ट्रोक्युशनमुळे मृत्यू अशा काही घटनांमध्ये विसेराचा तपास केला जातो. संशयाच्या आधारे पोलिस विसेरा तपासणी करतात.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा