सुशांत आत्महत्या प्रकरणात शवविच्छेदन करणाऱ्या डाॅक्टरांनी केला मोठा खुलासा

मुंबई पोलिसांनी आम्हाला लवकरात लवकर शवविच्छेदन करण्यास सांगितले होते

सुशांत आत्महत्या प्रकरणात शवविच्छेदन करणाऱ्या डाॅक्टरांनी केला मोठा खुलासा
SHARES

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) विशेष पथकाने अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातफास आवळण्यास सुरूवात केली आहे. या पथकाने साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तसेच मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, तांत्रिक आणि वैद्यकीय तपशील ताब्यात घेतली. सीबीआयच्या १५ सदस्यांची टीम या प्रकरणावर काम करत असून या टीमच्या पाच छोट्या तुकड्या करण्यात आल्या आहेत. यापैकी एका टीमने शनिवारी कूपर महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांचीही जबाब नोंदवला. त्यावेळी मुंबई पोलिसांनीच सुशांतचा शवविश्चेदन रात्री आणि लवकरात लवकर करण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. 

हेही वाचाः- सुशांत आत्महत्या प्रकरणात सीबीआयने फास आवळला

शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये अनेक चुका असल्याचे सीबीआयच्या टीमच्या निदर्शनास आले आहे. एवढ्या घाई घाईत सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन का करण्यात आले असा प्रश्न सीबीआयच्या अधिकार्‍यांनी विचारला असता एका डॉक्टरने थेट मुंबई पोलिसांचे नाव घेतले. मुंबई पोलिसांनी आम्हाला लवकरात लवकर शवविच्छेदन करण्यास सांगितले होते असा खुलासा या डॉक्टरने केल्याचे वृत्तात म्हटले आहे. १४ जून रोजी सुशांत वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरात पंख्याला लढकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच दिवशी रात्री सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन दुसर्‍याच दिवशी त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले होते.

हेही वाचाः- ‘या’ प्रश्नांची उत्तर सीबीआय रियाकडे मागणार

सुशांतच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर येण्याच्या आधीच म्हणजेच १५ जून रोजी रियाने शवगृहात गेल्याची माहिती समोर आली आहे. तिथे ती ४५ मिनिटें थांबली होती. या प्रकरणावरुन आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत. रुग्णालय प्रशासन आणि मुंबई पोलिसांनी रियाला शवगृहामध्ये जाण्याची परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित होता. रिया सुशांतच्या कुटुंबातील सदस्य नव्हती. त्यात हे प्रकरण आत्महत्येचे असल्याने रियाला सुशांतचा मृतदेह पाहण्याची आणि तिथपयर्ंत जाण्याची परवानगी कोणी आणि का दिली यासंदर्भातील अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. सुशांतच्या कुटुंबाच्या वतीने खटला लढणार्‍या वकिलांनाही रिया शवगृहामध्ये का गेली होती असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा