‘या’ प्रश्नांची उत्तर सीबीआय रियाकडे मागणार

सुशांतच्या आत्महत्येचा काही दिवस आधी रिया घर सोडून का गेली. या कारणांचे उत्तर अद्याप कुणालाच मिळालेलं नाही.

‘या’ प्रश्नांची उत्तर सीबीआय रियाकडे मागणार
SHARES

सुशांत सिंह राजपूतला आत्महत्या प्रकरणात सीबीआय रिया चक्रवर्तीला केव्हाही नोटीस पाठवून चौकशीला बोलवू शकते. रिया चक्रवर्ती यांना २४ ते ४८ तासांत नोटीस पाठविली जाऊ शकते. सुशांतच्या आत्महत्येचा काही दिवस आधी रिया घर सोडून का गेली. या कारणांचे उत्तर अद्याप कुणालाच मिळालेलं नाही. त्याप्रकरणात रविवारी सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पठानीस कूक निरज आणि चावीवाला सुशांत सावंत याची तीन तास चौकशी केली. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सीबीआय सुशांतच्या आत्महत्या करण्यापूर्वी घडलेल्या अनेक गोष्टींवर त्यावेळी घरात उपस्थित असलेल्यांच्या मदतीने  प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचाः- सीबीआय गुरुवारी घेणार सुशांतच्या घराची झडती

रविवारी सीबीआयचे अधिकारी त्यांच्या फाॅरेन्सिक टिमसह सुशांतच्या घरी गेले होते. त्या ठिकाणी ३ तास घरातील काना कोपऱ्यात तपासणी केली. इतकचं काय तर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सुशांतच्या इमारतीच्या टेरेसवर जाऊनही काही संशयास्पद गोष्ठी सापडतायत का ते पाहिले. त्यावेळी सोबत सुशांतचा मित्र सिद्धार्थ पठानी आणि कूक नीरज हेही सोबत होते. सुशांतने आत्महत्या केली त्याच्या आदल्या रात्री इमारतीत कुणी कुणी प्रवेश केला हे तपासण्यासाठी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाकडून रजिस्टरही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घेतलं आहे. तीन तासाच्या तपासणीनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पून्हा वांद्रे पोलिस ठाणे गाठतं सुशांत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी केलेला पंचनामा आणि व्हिडिओ तपासून पाहिल्याचे कळते. आत्महत्येच्या वेळी कुठली वस्तू कुठे आहे. याचे पोलिसांनी निरीक्षण केल्याचे कळते. त्याच बरोबर घटनास्थळी उपस्थित असलेले सुशांतचा मित्र सिद्धार्थ पठानी आणि कूक नीरज यांची सीबीआयने सुशांतच्या घरातच चौकशी केली. तसेच त्यांनी दिलेली सीबीआयला माहिती आणि पोलिसांना दिलेली माहिती यात फारकत आहे का तेही पडताळले.

हेही वाचाः- सुशांत प्रकरणाची अवस्था दाभोलकर हत्या प्रकरणासारखी होऊ नये- शरद पवार

या प्रकरणाचा ताबा आल्यापासून सीबीआयने आतापर्यंत या मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीची अद्याप चौकशी केलेली नाही. त्यामुळे रविवारी घडलेल्या घडामोडींनंतर सोमवारी रियाला चौकशीसाठी सीबीआयकडून बोलावले जाऊ शकते. त्यावेळी सुशांतसोबत काही भांडण झाले होते का, तसे नसेल तर मग आत्महत्येच्या आठवडाभर आधी घर का सोडलं, सुशांतसोबतचे आर्थिक व्यवहार, सुशांत मानसिक तणावात का होता. यासारख्या  प्रश्नांची उत्तरे रियाकडे मागितली जाऊ शकतात.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा