सुशांत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस तोंडघशी, तपास सीबीआयकडे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी लोकशाहीचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस तोंडघशी, तपास सीबीआयकडे
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सुनावणी दरम्यान दिला. सुशांतचे वडिल के.के. सिंह यांनी रियाचक्रवर्ती विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यावर सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे आदेश देिले. या  प्रकरणाची कारवाई ही पाटण्याऐवजी मुंबईतून केली जावी अशी मागणी करणारी याचिका रियानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. 

हेही वाचाः- यंदा १६ टक्के जास्त पाऊस, पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता

सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याला रियाने आत्महत्येस प्रवृत्त केले, तसेच त्याला लुबाडण्यात आल्याचा आरोप सुशांतचे वडिल के.के. सिंह यांनी केला होता. त्या विरोधात सिंह यांनी बिहारमध्ये गुन्हा ही दाखल केला होता. या गुन्ह्यांच्या तपासासाठी ज्या वेळी बिहार पोलिसांचे पथक मुंबईला आले होते. त्यावेळी त्यांना क्वारनटाईन करण्यात आले होते. त्यावर बिहार पोलिसांनी तपासात जाणून बुजून अडथळा मुंबई पोलिस आणत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडे या गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवण्याबाबत पत्र पाठवण्यात आले होते. त्यावर रिया चक्रवर्तीने आक्षेप घेत तपास मुंबई पोलिसांकडेच राहण्याबाबत याचिका दाखल केली होती. 

हेही वाचाः- बाप्पाच्या विसर्जनासाठी चौपाटीवर भाविकांना प्रवेश बंद

या याचिकेवर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान बिहार सरकारने दाखल केलेली एफआयआर योग्य असून बिहार सरकारला तपासाचा अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. बिहार पोलिसांचा अर्ज वैध असल्याचं सर्वाच्च न्यायालयाने म्हटलंय. मुंबई पोलिसांनी, महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावं. तसंच सर्वाच्च न्यायालयाकडून केस फाईल सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी लोकशाहीचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तपासासाठी आम्हाला सहकार्य केलं गेलं नाही, आमच्या अधिकाऱ्याला कैद्याप्रमाणे वागवलं असल्याची टीका त्यांनी केली.मात्र आता निपक्षपातीपणे तपास होईल, असं ते म्हणाले आहेत. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा