सुशांतच्या मनात माझ्या कुटुंबियांबद्दल ‘ही’ भावना होती- रिया चक्रवर्ती

सुशांतने लिहिलेले रियाच्या कुटुंबियांविषयीचे मत आणि त्याची आठवण रियाने केली शेअर

सुशांतच्या मनात माझ्या कुटुंबियांबद्दल ‘ही’ भावना होती- रिया चक्रवर्ती
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सुशांतच्या वडिलांनी सुशांतची मैत्रिण रियाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यानंतर तिने सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, तसेच रिया आणि तिच्या कुटुंबियातले सुशांतला त्रास देत असल्याचे आरोप होऊ लागले. असे असताना सुशांतने लिहिलेले रियाच्या कुटुंबियांविषयीचे मत आणि त्याची आठवण रियाने शेअर केली आहे. दरम्यान ईडीने काल रिया चक्रवर्तीची ९ तास चौकशी केली.

हेही वाचाः- मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा विमान अपघातात मृत्यू

सुशांत आणि रिया मागील अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत रहात होत्या. सर्व काही सुरळीत सुरू होतं, मग अचानक असं काय झालं की १४ जून रोजी सुशांतने आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर बाॅलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली. सुरूवातीला घराणेशाहीला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले. मात्र सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्तीलाच आरोपी ठरवत गुन्हा नोंदवल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. ऐवढेच काय तर रियाने सुशांतला टाॅर्चर केले. त्याची लूट केल्याचे आरोप रियावर करण्यात आले. पोलिसांनी ही बॅकतेतील व्यवहार तपासल्यानंतर रियाच्या अडचणी वाढ झाल्या, ईडीनेही काल रियाची चौकशी केली. मात्र आजही सुशांतने का आत्महत्या केली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

हेही वाचाः- बिहारच्या 'त्या' अधिकाऱ्याचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना, अचानक रियाच्या वकिलांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्याने करून सुशांतच्या आत्महत्येला रिया जबाबदार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुशांतच्या मनात रिया आणि तिच्या कुटुंबियांविषयी खूप आदर होता. सुशांतला डायरी लिहायची सवय होती. त्याच्या डायरीतील एक पान रियाच्या वकिलांनी शेअर केले आहे. त्यात सुशांतने रियाच्या कुटुंबियांची आभार यादी लिहीली आहे. त्यात त्याने मी माझ्या आयुष्यातील माझ्या जीवनाबद्दल या सर्वांसाठी कृतज्ञ आहे. मी माझ्या आयुष्यातील बेबू (रिया), सर (रियाचे वडिल), मॅम (रियाची आई), लिलू (शोविक रियाचा भाऊ), फज (सुशांतचा कुत्रा) या बद्दल कृतज्ञता आहे. सुशांतचे हस्ताक्षर असलेले हे पान सुशांतच्या डायरीतले असून ते रियाच्या वकिलांनी शेअर केले आहे. तर सुशांत ज्या बाटलीने पाणी पियायचा ती आजही त्याची आठवण म्हणून रियाने संभाळून ठेवली आहे. या लिहिलेल्या पत्रातून  सुशांतला रिया किंवा तिच्या घरातले टाॅर्चर करत होते, तो त्याच्याबद्दल नाखूष होता हे स्पष्ठ होत नाही. त्यामुळे रियाला सुशांतच्या आत्महत्येस दोषी धरणे चुकीचे असल्याचे रियाच्या वकिलांचे मत आहे.संबंधित विषय