Advertisement

मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा विमान अपघातात मृत्यू

वायूदलातून निवृत्त झाल्यानंतर दीपक साठे २००३ साली एयर इंडियामध्ये रुजू झाले. दीपक साठे हे मुंबईच्या पवईतील जलवायू विहार येथे राहत होते.

मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा विमान अपघातात मृत्यू
SHARES

केरळच्या कोझीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वायूदलात विंग कमांडर असलेले कॅप्टन दीपक साठे यांनी १९८१ ते २००३ या कालावधीमध्ये देशसेवा केली. वायूदलातून निवृत्त झाल्यानंतर दीपक साठे २००३ साली एयर इंडियामध्ये रुजू झाले. दीपक साठे हे मुंबईच्या पवईतील जलवायू विहार येथे राहत होते. 

हेही वाचा ः-‘या’ गुन्ह्यात रॅपर बादशाहची पोलिसांनी केली ४ तास चौकशी

कोझीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये आत्तापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. एयर इंडियाचं A737 बोईंग हे विमान रनवेवर घसरलं आणि दरीमध्ये गेलं. हे विमान दुबईहून भारतात परतत असताना केरळच्या कोझिकोड विमानतळावर कोसळलेे त्यात विंग कमांडर दीपक वंसत साठे यांचे निधन झाले. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली असून, मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे  हे विमान घसरले आणि त्याचा अपघात झाला. हा अपघात इतक भीषण होता की, हे विमान दोन भागात मोडल्याचे अहवालात म्हटले आहे. कॅप्टन साठे यांच्यासह  त्याचे सहकारी पायलट अखिलेश कुमार यांचेही या अपघातात निधन झाले. त्यांचे मृतदेह सध्या कोझिकोडच्या एमआयएमएस रुग्णालयात नेण्यात आले आहेत 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement