Advertisement

विमानतळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे मुंबई आणि हैद्राबाद येथे छापे

मुंबई एअरपोर्टच्या सभोवताली २०० एकर जागा होती. ती जागा मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला विकासासाठी देण्यात आली होती. त्यासाठी विविध कंपन्यांसोबत कंत्राट करून त्याचे पैसे त्यांना देण्यात आले.

विमानतळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे मुंबई आणि हैद्राबाद येथे छापे
SHARES

मुंबई विमानतळ गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) हैद्राबाद आणि मुंबईतील जीव्हीके ग्रुपशी संबधित ९ ठिकाणी मंगळवारी छापे टाकले. याप्रकरणी ईडीकडून पुढील आठवड्यापासून संबंधीत व्यक्तींची चौकशी करणार आहे. याप्रकरणी बोगस वर्क ऑर्डरच्या मदतीने नऊ कंपन्यांमार्फत ७०५ कोटींचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे.

हेही वाचाः-महाराष्ट्र बोर्डाचा १० वीचा निकाल उद्या होणार जाहीर

हैद्राबाद येथील जीव्हीकेच्या कार्यालयात ईडीने शोध मोहिम राबवली . तसेच मुंबईतील इंटरनॅशनल एअरपोर्ट येथेही शोध मोहिम राबवण्यात आली. हैद्राबाद येथील आठ व मुंबईतील एका ठिकाणी ही शोध मोहिम राबवल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणातील तक्रारीनुसार, मुंबई एअरपोर्टच्या सभोवताली २०० एकर जागा होती. ती जागा मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला विकासासाठी देण्यात आली होती. त्यासाठी विविध कंपन्यांसोबत कंत्राट करून त्याचे पैसे त्यांना देण्यात आले. पण ही कामे प्रत्यक्षात झालीच नाही. बनावट वर्क ऑर्डरच्या मदतीने हे ३१० कोटी रुपये खर्च झाल्याच दाखवण्यात आले. त्यामुळे एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाला नुकसान झाले.

हेही वाचाः- Electricity Bill: अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

सीबीआयच्या गुन्ह्यानुसार याप्रकरणी ७०५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड अर्थात एमआयएएल नावाची जॉईंट व्हेंचर कंपनी जीव्हीके एअरपोर्ट होल्डिग्ज लिमिटेड, एअरपोर्ट अथॉरिटी इंडिया व इतर काही विदेशी कंपन्यांनी तयार केली होती. यात जीव्हीकेचे ५० टक्के शेअर्स होते, एएआयचे २६ टक्के शेअर्स होते. तर उर्वरित शेअर्समध्ये इतर कंपन्यांकडे होते. याप्रकरणी सीबीआयने जीव्हीके उद्योग समूहाचे अध्यक्ष व मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डी, मुलगा जीव्ही संजीव रेड्डी यांच्यासह गैरव्यवहारात सहभागी असलेल्या ११ आरोपी कंपन्यांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर जुलै महिन्यात ईडीनेही याप्रकरणी मनी लाँडरींगचा गुन्हा दाखल केला होता.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा