Advertisement

महाराष्ट्र बोर्डाचा १० वीचा निकाल उद्या होणार जाहीर

मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल उद्या (बुधवारी) जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाचा १० वीचा निकाल उद्या होणार जाहीर
SHARES

मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल उद्या (बुधवारी) जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. SSC Result 2020 या संकेत स्थळावर निकाल पाहता येणार आहे.

‘इथं’ पहा निकाल

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक, कोल्हापूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेचा निकाल बुधवार २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होईल.

दहावीची परीक्षा ही ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान घेण्यात आली. याच काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. २०२० मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यी बसले होते. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी, तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनी परिक्षेत बसल्या होत्या.

मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यात कोरोनामुळे देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे, राज्यातील शैक्षणिक क्षेत्रावरही याचा परिणाम झाला. दहावीचा एक पेपर रद्द करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांनी जुलै महिन्यात निकाल लागणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण तारीख सांगितली नव्हती.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वर्षा गायकवाड यांनी जुलै महिन्यात या दोन्ही परीक्षांचे निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती दिली होती. १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागू नये, म्हणून हे निकाल जुलै महिन्यात लावण्याचा आमचा प्रयत्न असेल. कोरोना आणि लॉकडाऊनमुळं यंदा हे निकाल जवळपास महिनाभर उशिरा लागणार आहेत. १० वीचे निकाल जुलै अखेरपर्यंत लावले जावेत. जेणेकरून ऑगस्ट महिन्यात पुढच्या वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू करता येईल’, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा