Yes bankःराणा कपूरच्या मुलीला विमानतळावर रोखल

राणा कपूर यांच्यासोबतच त्यांची पत्नी बिंदू कपूर, मुलगी राखी कपूर टंडन, राधा कपूर आणि रोशनी कपूर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध ईडीने लूकआउट नोटीस बजावली.

Yes bankःराणा कपूरच्या मुलीला विमानतळावर रोखल
SHARES

यस बँक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे संस्थापक राणा कपूर याच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. या गैरव्यवहारात राणाच्या पत्नीचा ही समावेश पुढे आला आहे. त्याच बरोबर कुटुंबातील इतर सदस्यांच्या खात्यावर गैरव्यवहारातील रक्कम वळवण्यात आल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमिवर ईडीने राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूरला लंडनला जाण्यापासून थांबवण्यात आले आहे. विमानतळावरच रोशनीला अडवले. कपूर यांच्या कुटुंबाविरोधात एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

हेही वाचाः- 'इतक्या' महिला चालक एसटी सेवेत होणार दाखल

येस बँक गैरव्यवहार प्रकरणात बँकेचे संस्थापक आणि (YES Bank Crisis) माजी सीईओ राणा कपूर यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. शनिवारी ३४ तास चौकशी केल्यानंतर ईडीने राणा कपूर यांना अटक केली. त्यानंतर पीएमएलए कोर्टाने त्यांची ११  मार्चपर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली. राणा कपूर यांच्यासोबतच त्यांची पत्नी बिंदू कपूर, मुलगी राखी कपूर टंडन, राधा कपूर आणि रोशनी कपूर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध ईडीने लूकआउट नोटीस बजावली. यानंतर राणा कपूर यांच्या मुलीने देश सोडून लंडनला पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, मुंबई पोलिसांनी राणा कपूर यांची कन्या रोशनी कपूरला मुंबई विमानतळावर अडवलं. ब्रिटिश एअरवेजने लंडनला निघालेल्या रोशनीला मुंबई पोलिसांनी रोखलं.

हेही वाचाः- मेट्रोनंतर रेल्वे-एसटी करोनासाठी सज्ज

दुसरीकडे राणा कपूर यांच्या राजकीय कनेक्शनवरूनही राजकारण तापलं आहे. भाजपने शुक्रवारी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यासोबत राणा कपूर यांचे फोटो दाखवून काँग्रेसला लक्ष्य केले होते. त्यातच प्रियांका गांधी यांचे पेंटिंग राणा कपूर यांनी खरेदी केल्याची माहिती पुढे येत आहे. यूपीए सरकारच्या काळात राणा कपूर यांनी २ कोटी रुपयांना हे पेंटिंग खरेदी केले होते, अशी खात्रीशीर माहिती असून आयटी विभागाने याची चौकशी सुरू केली आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा