Advertisement

मेट्रोनंतर रेल्वे-एसटी कोरोनासाठी सज्ज

कोरोना व्हायरससाठी मेट्रोनंतर रेल्वे-एसटी प्रशासन देखील सज्ज झाल आहे.

मेट्रोनंतर रेल्वे-एसटी कोरोनासाठी सज्ज
SHARES

मुंबईसह जगभरातील नागरिकांच्या मनात भयंकर अशा कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. सर्वत्र कोरोना व्हायरसची चर्चा असून, अनेक जण खबरदारी घेऊन घराबाहेर पडत आहेत. कोरोना व्हायरसच वाढता प्रभाव पाहता मुंबई विमानतळावर, मेट्रो १ मार्गावरील स्थानकातील परिसर स्वच्छ ठेवण्यात येत आहे. अशातच रेल्वे व एसटी प्रशासन देखील सज्ज झाला आहे.

आजारापासून बचावासाठी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकातील उद्घोषणा यंत्रणेतून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, खोकताना-शिंकताना तोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर ठेवा, वापरण्यात आलेले टिश्यू पेपर त्वरीत बंद कचऱ्यांच्या डब्यात टाका असे संदेश देण्यात येत आहे. रेल्वेच्या रुग्णालयांना देखील पूर्णपणे सज्ज राहण्याचे आदेश रेल्वे मंडळाकडून देण्यात आले आहे.

राज्यात एकूण ६०८ बस स्थानकांपैकी ५५० वापरात असलेल्या बस स्थानक, प्रसाधनगृह आणि एसटी परिसरात स्वच्छता राखावी. प्रसाधनगृहांची स्वच्छता करताना जंतूनाशकांचा वापर करावा, अशी सूचना एसटी महामंडळाने केली आहे. 

स्थानकांसह आगार, कार्यशाळा या सर्व ठिकाणी कोरोना बचावासाठी ७ कलमी उपाययोजना राबवण्याचे आदेश एसटी मुख्यालयातून विभाग नियंत्रकांना आहेत. यात श्वसन संस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे, वेळोवेळी व जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे, नाक-डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करू नये, अर्धवट शिजलेले-कच्चे अन्न खाऊ नये, हस्तांदोलन टाळा, जंगली आणि पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळावा, या ७ उपाययोजनांचा समावेश आहे.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्यातील यात्रा, उत्सव स्थगित करण्याच्या सूचना देण्यात सरकारने दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान म्हणून सैलानी बाबांची ख्याती आहे. 

होळीपासून ५ दिवसांवर सैलानी बाबांचा संदल असतो. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह तेलंगण, आंध्रप्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या सर्व भागांतून सुमारे ८-१० लाख भाविक येतात. या यात्रेसाठी महामंडळाकडून हजारो विशेष एसटींचे नियोजन करण्यात येणार होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा