Advertisement

'इतक्या' महिला चालक एसटी सेवेत होणार दाखल

येत्या आर्थिक वर्षांत आदिवासी आणि दुष्काळग्रस्त भागातील २१३ महिला चालक कम वाहक म्हणून सेवेत येणार आहेत.

'इतक्या' महिला चालक एसटी सेवेत होणार दाखल
SHARES

एसटी महामंडळात पुरुषांप्रमाणे आता महिला चालक एसटी चालवत आहेत. त्यातच आता येत्या आर्थिक वर्षांत आदिवासी आणि दुष्काळग्रस्त भागातील २१३ महिला चालक कम वाहक म्हणून सेवेत येणार आहेत. आदिवासी भागातील २१ महिलांचे अंतिम प्रशिक्षण सुरू असून प्रथम याच महिला सप्टेंबर २०२० पर्यंत एसटीत दाखल होणार आहेत.

दुष्काळग्रस्त भागातील महिला ४ ते ५ महिन्यांनी रुजू होणार आहेत. आदिवासी भागातील महिलांना रोजगार म्हणून एसटीत भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एसटीत चालक कम वाहक म्हणून भरतीची संधी देण्यात आली. त्यानुसार २१ महिलांची निवड झाली. सध्या त्यांची यवतमाळ जिल्हय़ातील पांढरकवडा येथे एसटीचे प्रशिक्षण सुरू आहे. 

हे प्रशिक्षण ६ महिन्यांचे असून ऑगस्ट २०२० पर्यंत संपणार आहे. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत त्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यांना लांब पल्लय़ाच्या मार्गावर नियुक्त न करता कमी अंतराच्या मार्गावरच काम दिले जाणार आहे. यापाठोपाठ दुष्काळग्रस्त भागातील महिलाही चालक कम वाहक म्हणून सेवेत येणार आहेत. 

महिला चालक भरती करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी सुरुवात करताच त्यासाठी ६०० अर्ज आले होते. या अर्जाची छाननी केल्यानंतर यातील १९२ महिलांची निवड करण्यात आली. त्यांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहेत. त्यानंतर शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) प्रशिक्षण होणार आहे.

या महिला चालकांना सेवेत जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२१ पर्यंत येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना सुरुवातीला १५ हजार रुपयांपासून वेतन मिळण्यास सुरुवात होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा