बिहारच्या 'त्या' अधिकाऱ्याचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

मुंबईत पावला पावलावर ते बिहार पोलिसांच्या तपासात अडथळे आणत होते. त्यांनी मला नाही, तर आमच्या तपासाला क्वारनटाईन केले” अशी नाराजी विनय कुमार यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली.

बिहारच्या 'त्या' अधिकाऱ्याचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
SHARES

सुशांत आत्महत्येच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहारच्या आपीएस अधिकारी विनय तिवारी यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “मुंबई पोलिसांनी निपक्ष तपास करायला देणं अपेक्षित होतं. मात्र मुंबईत  पावला पावलावर ते बिहार पोलिसांच्या तपासात अडथळे आणत होते. त्यांनी मला नाही, तर  आमच्या तपासाला क्वारनटाईन केले” अशी नाराजी विनय कुमार यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली.

हेही वाचाः- मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा विमान अपघातात मृत्यू

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात सुशांतचे वडिल केके सिंह यांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर या गुन्ह्याल वेगळेच वळण मिळाले. या आत्महत्येच्या तपासासाठी मग बिहार पोलिस मुंबईत दाखल झाले. मात्र आल्या दिवसांपासून बिहार पोलिसांच्या तपासात मुंबई पोलिस अडथळे निर्माण करताना दिसत होती. कोरोनाबाबत त्यांनी आखलेल्या कायद्यांचे आम्ही पालन केलं. मात्र त्यामुळे आमच्या तपासाचा वेग थंडावला. मात्र आम्ही विशेष गुन्ह्याच्या तपासाला आलो होतो. त्यामुळे आमच्यासोबत जे झालं ते चुकीचं आहे. बिहारमध्ये जर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर या प्रकरणात तपासाचा हक्क आम्हाला ही आहे.  ज्या गतीने आमचा तपास सुरू होता. त्या गतीने आम्हाला तपास करू दिला नाही. असे आरोप बिहारचे पोलिस अधिक्षक विनय तिवारी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवले.

हेही वाचाः-Mumbai Rains: ११ आॅगस्टनंतर वाढणार पावसाचा जोर! स्कायमेटचा अंदाज

विनय तिवारी यांना बिहार पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत पाठवले होते. मात्र मुंबईत येताच त्यांना रात्री ११ वा. जबरदस्ती होम क्वारनटाईन केले. मुंबई पोलिसांच्या या वागणूकीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे नाराजी व्यक्त केली. बिहार पोलिसांच्या आजीने कुमार यांना सोडण्यासाठी पत्र व्यवहार केल्यानंतरही तिवारी यांना सोडले जात नव्हते. अखेर कुमार यांना मुंबई पोलिसांनी ७ दिवसांचा क्वारनटाईन पूर्ण झाल्यानंतर सोडले. शुक्रवारी सांयकाळी ५ च्या फ्लाइटने ते बिहारला रवाना झाले.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा