Advertisement

Mumbai Rains: ११ आॅगस्टनंतर वाढणार पावसाचा जोर! स्कायमेटचा अंदाज

मुंबई व उपनगरामध्ये ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान मध्यम व हलक्या सरी बरसतील. त्याचसोबत ढगांमुळे हवामान सुखद राहील.

Mumbai Rains: ११ आॅगस्टनंतर वाढणार पावसाचा जोर! स्कायमेटचा अंदाज
SHARES

मुंबई आणि आसपासच्या परिसरात मागील ३ ते ४ दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. परंतु सलग ३ दिवस मुसळधार पडल्यानंतर आता पावसाची तीव्रता थोडीफार कमी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये सांताक्रूझमध्ये ७९ मिमी आणि कुलाब्यात २५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची रिपरिप कायम असली, तरी दिवसभरात कुठेही पाणी तुंबून मुंबईकरांचे हाल झाले नाहीत. (Rains will increase over Mumbai and suburbs by August 11  Skymet)

हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेय या संस्थेच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाची तीव्रता कमी होईल. या दरम्यान पावसाच्या तुरळक सरी अधूनमधून पडत राहतील. एवढंच नाही, तर मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाला विश्रांती मिळेल. ११ ऑगस्टपासून मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढेल. परंतु या काळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सध्या तरी वाटत नाही. मुंबई व उपनगरामध्ये ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान मध्यम व हलक्या सरी बरसतील. त्याचसोबत ढगांमुळे हवामान सुखद राहील. 

हेही वाचा- मुसळधार पावसाचा इशारा! एनडीआरएफच्या १६ टीम तैनात

आॅगस्ट महिन्यात मुंबईत सरासरी ५८५.२ मिमी इतका पाऊस पडतो. परंतु यावर्षी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या ७ दिवसांमध्येच सांताक्रूझमध्ये ५९७.८ मिमी आणि कुलाब्यात ६७४.६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दोन्ही ठिकाणच्या वेधशाळेने आॅगस्ट महिन्यातील पावसाची सरासरी पहिल्या आठवड्यातच ओलांडली आहे.  

गेल्या दशकभरात मुंबईत हवामानातील तीव्र घटना वारंवार होत आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीत एक किंवा दोनदा तीव्र वा अती तीव्र पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा- Mumbai Rains : गेल्या १२ तासात पडलेल्या पावसानं मोडला ४६ वर्षांचा रेकॉर्ड

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा