Advertisement

मुसळधार पावसाचा इशारा! एनडीआरएफच्या १६ टीम तैनात

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात करण्यात आल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मुसळधार पावसाचा इशारा! एनडीआरएफच्या १६ टीम तैनात
SHARES

राज्यात मागील ३ ते ४ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात करण्यात आल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. (16 rescue team of ndf ready in maharashtra for heavy rain says vijay wadettiwar)

मुंबई, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाची आपत्कालीन यंत्रणा  सज्ज आहे. राज्यात अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १६ टीम राज्याच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन व सर्व आपत्कालीन यंत्रणा  सतर्क आहेत. तसंच जनतेला घरातच सुरक्षित राहण्याचं आवाहनही विजय वडेट्टीवार यांनी केलं. 

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १६ टीमपैकी मुंबईत ५, कोल्हापूरमध्ये ४, सांगली २ , सातारा १, ठाणे १, पालघर १, नागपूर १, रायगड १ अशा टीम ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - “ही तर नैसर्गिक आपत्ती, मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपये द्या”

बुधवारी पावसाचा जोर अधिक होता. या दिवशी १२ तासात पडलेल्या पावसानं तर दक्षिण मुंबईतील ४६ वर्षांचा रेकॉर्ड तोडला. कुलाबा वेधशाळेनं १२ तासात २९३.८ मिमी पावसाची नोंद केली. ऑगस्टमध्ये गेल्या २४ तासात पडलेल्या पावसानं उच्चांक गाठला आहे. १९७४ नंतर इतका पाऊस कोसळला. यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं. 

मुसळधार पावसासोबतच शहरात जोरदार वारे वाहत होते. परिणामी सखल भागात ठिकठिकाणी पाणी तुंबलं, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील २०० हून अधिक झाडे उन्मळून पडली. रस्त्यावरील गुडघ्याभर पाण्यात वाहने अडकून पडली, तर ट्रॅकवरही पाणी साचल्याने लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी एनडीआरफच्या जवानांची मदत घ्यावी लागली. 

मुंबईत बुधवारी ताशी १०१ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत होते. हे एक प्रकारचं वादळच होतं. केवळ दक्षिण मुंबईतच हे वादळ होतं. कुलाबा ते नरिमन पॉइंट परिसराला पावासाने अक्षरश: झोडपून काढलं. मुंबईत फक्त ४ तासांत ३०० मिमी पाऊस पडला. मी ३० वर्षांपासून मुंबईत आहे. २६ जुलैलाही मी मुंबईत होतो. पण असा पाऊस कधीच बघितलेला नाही, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा