Advertisement

मुंबईत आणखी एका कलाकाराची आत्महत्या, 'या' अभिनेत्रीनं घेतला गळफास

टीव्ही कलाकार समीर शर्मा यांच्या आत्महत्येची बातमी आज समोर आली. त्यानंतर आणखी एका अभिनेत्रीनं आपलं आयुष्य संपवलं आहे. सुसाईड नोटमध्ये तिनं 'हे' कारण दिलं आहे.

मुंबईत आणखी एका कलाकाराची आत्महत्या, 'या' अभिनेत्रीनं घेतला गळफास
SHARES

टीव्ही मालिका आणि भोजपुरी चित्रपटात काम करणारी अभिनेत्री अनुपमा पाठक यांनी वैयक्तिक कारणामुळे आत्महत्या केली आहे. रविवारी रात्री अनुपमानं स्वत: ला फाशी देऊन आत्महत्या केली.

एवढे मोठे पाऊल उचलण्यापूर्वी अनुपमानं एक सुसाइड नोटही लिहली. त्यात तिनं आत्महत्या करण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. अनुपमानं आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या फेसबुक अकाऊंटवर लाईव्ह सेशनही केलं होतं. ज्यात तिनं तिला झालेला त्रास व्यक्त केला होता.


अनुपमा मुंबईच्या दहिसर चौकी इथल्या ठाकूर मॉलजवळील एमएमआरडीए इमारतीत भाड्याच्या घरात राहत होती. रविवारी रात्री तिनं आत्महत्या केली. पण चार दिवसानंतर तिचा मृतदेह आढळून आला. स्वत: ला फाशी देण्यापूर्वी तिनं एक सुसाइड नोट सोडली. ज्यामध्ये तिनं हे पाऊल उचलण्यासाठी दोन कारणं दिली.

अमर उजालानं दिलेल्या वृत्तानुसार, पहिलं कारण तिनं लिहलं आहे की, 'मनीष झा नावाच्या व्यक्तीनं लॉकडाऊन दरम्यान मे महिन्यात माझी दुचाकी माझ्याकडून घेतली. त्यावेळी, ती तिच्या मूळ निवासस्थानी होती. मी परत आल्यावर मनीषनं माझी मोटरसायकल देण्यास नकार दिला.'

दुसरे कारण सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, 'मी मित्राच्या सांगण्यावरून विस्डम प्रॉडक्शन कंपनीत १० हजार रुपये गुंतवले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीनं माझे पैसे व्याजासह परत करणार होती. पण आता ती कंपनी मला माझे पैसे परत देण्यास नकार देत आहे.'

अनुपमाच्या घरातून मिळालेल्या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काशिमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पीआय संजय हजारे म्हणाले, आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत. तथापि, सर्व वस्तुस्थितीचा तपास पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या दोषींविरोधात कारवाई केली जाईल.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या कथित आत्महत्या प्रकरणात अनुपमा पाठक यांनी सोशल मीडियावरही आवाज उठवला आहे.

दरम्यान बुधवारी सकाळी समीर शर्मा या टीव्ही कलाकारानं देखील आत्महत्या केली. कहानी घर घर की या मालिकेत समीर शर्मानं काम केलं होतं. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण कळू शकलं नाही.हेही वाचा

प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे कोरोनाग्रस्त, लीलावती रुग्णालयात दाखल

टीव्ही कलाकार समीर शर्माची आत्महत्या

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा