Advertisement

टीव्ही कलाकार समीर शर्माची आत्महत्या

घरातील किचनच्या छताला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

टीव्ही कलाकार समीर शर्माची आत्महत्या
SHARES

कलाविश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता समीर शर्मानं मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ४४ वर्षीय समीर मुंबईतील मालाड पश्चिमस्थित अंहिसा मार्गावरील नेहा सीएचएस या बिल्डिंगमध्ये वास्तव्याला होत्या. घरातील किचनच्या छताला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरनं यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या इमारतीत फ्लॅट भाड्यानं घेतला होता. रात्र ड्यटुीला असललेल्या सोसायटीच्या चौकीदारानं समीरला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. मृतदेहाची अवस्था पाहता समीरनं दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. घटनास्थळावरुन पोलिसांना सुसाइड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

समीरनं छोट्या पडद्यावरील कहानी घर घर की, क्योंकी की सास भी कभी बहू थी, ज्योती, ये रिश्ते हैं प्यार के या गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. त्याच्या आत्मनहत्येचं कारण अजून कळू शकलं नाही.हेही वाचा

प्रायोगिक रंगभूमीला नवचेतना कशी देणार? जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाची बैठक

न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास, सत्य समोर येईल - रिया चक्रवर्ती

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement