बहुचर्चित आयसीआयसीआय बॅक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी चंदा कोचर यांना ईडीने सोमवारी चांगलाच दणका दिला. या प्रकरणात ईडीने चंदा यांचे पती दिपक कोचर यांना सोमवारी रात्री अटक केली. व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात पदाचा गैरवापर करत चंदा कोचर यांनी पतीला फायदा मिळवून दिला असा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात दिपक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्या चौकशीत दिपक यांचा सहभाग निश्चित झाल्यानंतर ईडीने त्यांना अटक केल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.
Enforcement Directorate (ED) arrests Deepak Kochar, husband of former ICICI Bank MD & CEO Chanda Kochar in connection with ICICI Bank-Videocon case: Enforcement Directorate (ED) officials pic.twitter.com/b86l6Gs2Eh
— ANI (@ANI) September 7, 2020
विडिओकॉन हायड्रोकार्बन होल्डिंग लिमिटेड (व्हीएचएचएल) या कंपनीने व्हीडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड (व्हीआयएल) च्या मालकीच्या कंपनीने २००८ मध्ये मोझांबिकच्या ऑईल अॅड गॅस ब्लॉक (रोव्हुमा एरिया १ ब्लॉक) मध्ये १० टक्के 'पार्टिसिडींग इंटरेस्ट' विकत घेतले. हे प्रकल्प विकत घेण्यासाठी वेणू यांनी स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. हे कर्ज वेणू हे फेडू न शकल्यामुळे बँकांनी हे प्रकल्प ताब्यात घेतले. या प्रक्रियेत बँकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. हा व्यवहार करताना धूत यांनी कर्ज मिळवण्यासाठी बँकेतील अधिकाऱ्यांना हाताशीधरून गैरव्यवहार केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. या पूर्वी ही आयसीआयसीआय बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात धूप यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील कार्यालयावर छापे टाकले होते. मनी लॉडरिंग प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांच्यासह ईडीने धूत यांचीही चौकशी केली होती.आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडिओकॉन समूहाला १८७५ कोटींचं कर्ज मंजूर करताना त्यात भष्टाचार झाल्याचा तसेच अनियमितता असल्याचाही आरोप केला होता. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावरच ईडीने हा गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचाः- रुग्णालयांच्या तक्रारीसाठी नवी मुंबई पालिकेकडून कॉल सेंटर
मागील अनेक दिवसांपासून या बहुचर्चित आर्थिक घोटाळ्यामुळे पदावरून चंदा कोचर यांना पाय उतारही व्हाव लागलं. या प्रकरणात अखेर ईडीने दिपक यांना चौकशीसाठी सोमवारी बोलावले होते. या चौकशीसाठी दिपक हजर राहिल्यानंतर त्याचा गुन्ह्यातील सहभाग निश्तिच झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. याघटनेमुळे चंदा कोचर यांच्यावरही अटकेची टांगती तलवार लटकत असल्याचे बोलले जाते.