Advertisement

रुग्णालयांच्या तक्रारीसाठी नवी मुंबई पालिकेकडून कॉल सेंटर

रूग्णालयांची नागरिकांना सुलभपणे विनासायास आपली तक्रार नोंदविता यावी व त्यावर विहित वेळेत योग्य कार्यवाही व्हावी यासाठी पालिकेने आता एक काॅल सेंटर सुरू केलं आहे.

रुग्णालयांच्या तक्रारीसाठी नवी मुंबई पालिकेकडून कॉल सेंटर
SHARES

खाजगी रूग्णालये शासनाने जाहीर केलेल्या दरांपेक्षा जास्त दर आकारात असल्याच्या तक्रारी नवी मुंबई महापालिकेकडं आल्या आहेत. रूग्णालयांची नागरिकांना सुलभपणे विनासायास आपली तक्रार नोंदविता यावी व त्यावर विहित वेळेत योग्य कार्यवाही व्हावी यासाठी पालिकेने आता एक काॅल सेंटर सुरू केलं आहे.

त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी कोव्हीड रूग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांकडून आकारण्यात आलेल्या बिलांच्या तक्रारी संदर्भातील मदतीसाठी कोव्हीड १९ बिल तक्रार निवारण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. याकरिता ०२२- २७५६७३८९ हा दूरध्वनी क्रमांक तसंच ७२०८४९००१० हा व्हॉट्स ॲप क्रमांक संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीत तळमजल्यावर  ७ सप्टेंबर पासून सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत 'कोव्हीड बिल तक्रार निवारण केंद्र  सुरू करण्यात येत आहे. या विशेष केंद्राकरिता ०२२- २७५६७३८९ हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात येत असून कोव्हीड रूग्ण अथवा त्यांचे नातेवाईक कोव्हीड बिलांविषयीच्या तक्रारीसाठी त्यावर संपर्क साधू शकतील.

या केंद्रातील कर्मचारी संपर्क साधणा-या व्यक्तीकडून रूग्णाचे नाव, तक्रारदाराचे नाव, मोबाईल व संपर्कध्वनी क्रमांक, रूग्णाचा पूर्ण पत्ता, रूग्णालयाचे नाव व पत्ता, रूग्णालयात दाखल दिनांक, रूग्णालयातून डिस्चार्ज दिनांक, रूग्णालयाने आकारलेल्या बिलाची रक्कम व तक्रारीची संक्षिप्त माहिती विचारतील. त्यानंतर तक्रारदार व्यक्तीस cbcc@nmmconline.com या ई मेल आय डी वर अथवा ७२०८४९००१० या व्हॉट्स अॅप क्रमांकावर बिलाच्या प्रती पाठविणेबाबत सूचित केले जाईल. या प्रती प्राप्त झाल्यानंतर तक्रारदारास विशिष्ट टोकन क्रमांक दिला जाईल.

 बिलांविषयी प्राप्त झालेल्या तक्रारींवर महानगरपालिकेच्या वतीने २४ तासांत योग्य ती कार्यवाही केली जाईल व सदर कक्षाकडून तक्रारदाराला तक्रारीविषयी करण्यात आलेल्या कार्यवाहीविषयी माहिती देण्यात येईल. याशिवाय तक्रारदार आपल्या टोकन क्रमांकाचा संदर्भ देऊन आपल्या तक्रारीविषयी करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती या केंद्राकडून उपलब्ध करून घेऊ शकेल.


हेही वाचा -

मुंबईत अतिदक्षता खाटांची कमतरता

लोकल ट्रेन सुरू झालीच पाहिजे! विरार स्थानकात प्रवाशांचा उद्रेक


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा