पनवेल महापालिका हद्दीत ७३ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (६ जानेवारी) ७३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच तळोजा फेज-१ येथील एका मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १३,  नवीन पनवेल ११, खांदा काॅलनी १, कळंबोली ११, कामोठे ११, खारघर २५,  तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल २, नवीन पनवेल १२, कळंबोली २, कामोठे ९, खारघर येथील १३ येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २७७९४ कोरोना रूग्णांपैकी २६७९९ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६१० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३८५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


हेही वाचा -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

मध्य रेल्वेच्या स्थानकांत फेब्रुवारीपासून ई-बाईक


पुढील बातमी
इतर बातम्या