COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी
SHARES

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीनं फोन करून ही धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्यानं अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली असून, २२ डिसेंबरला किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिका कार्यालयात असताना धमकी दिल्याचं समजतं.

याप्रकरणी ३१ डिसेंबर २०२० रोजी आजाद मैदान पोलीस ठाण्यात FIR क्रमांक. 261 / 2020 अंतर्गत जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पोलीस पुढील तपास करत आहेत. मागील काही दिवसांपासून किशोरी पेडणेकर सातत्यानं भाजपवरही हल्लाबोल करत होत्या. ईडीच्या चौकशीवरूनही त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता.

'ईडी ही आपल्या देशाची महत्त्वाची संस्था आहे. जे काही सत्य आहे ते पारदर्शकपणे जनतेसमोर येईल. आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे असे जनतेचे देखील मत आहे. यामुळं विरोधकांना आयते कोलीत हातात मिळालं आहे. परंतु निश्चितपणे जे सत्य आहे ते बाहेर येईल', अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली होती.

'कोरोनाच्या संकटातही त्यांनी यंदा घरी बसून ३१ डिसेंबरला रात्री प्रार्थना करा. नवीन वर्षाचं स्वागत करा. मुंबईकर गाईडलाईन पाळत आलेले आहेत. ज्यांना यात राजकारण करायचं आहे. त्यांच्यावर पालिका आणि पोलीस कारवाई करतील', असा सूचनावजा इशाराही दिला होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा