पालिकेेच्या इशाऱ्यानंतर मुंबईतील ७५ टक्के नर्सिंग होम्स सुरू

नर्सिंग होम्स सुरू न केल्यास परवाने रद्द करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेने शुक्रवारी दिला होता. त्यानंतर सोमवापासून मुंबईतील ७५ टक्के नर्सिंग होम्स सुरू झाले आहेत. मुंबईत सोमवारी १ हजार ४१६ खासगी 'नर्सिंग होम' पैकी १ हजार ६८ (७५.४२ टक्के) नर्सिंग होम्स  सुरू झाले आहेत. तर महापालिका क्षेत्रातील ९९ डायलिसिस सेंटर पैकी ८९ डायलिसिस सेंटर सुरू झाले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वच खासगी नर्सिंग होम्स बंद होती. ही नर्सिंग होम्स सुरू न केल्यास त्यांचे परवाने रद्द करू, अशा इशारा मुंबई महापालिकेने दिला होता. तसंच खासगी दवाखाने सुरू न करणाऱ्या डॉक्टरांवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही  महापालिकेने दिली होती. पालिकेनेच्या या तंबीनंतर नर्सिंग होम्स मालक ताळ्यावर आले आहेेत. 

मुंबईत ७५ टक्के खासगी नर्सिंग होम सुरू झाले आहेत. मात्र, २५ टक्के नर्सिंग होम अजूनही बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार सूचना देऊन देखील हे'नर्सिंग होम आपली सेवा सुरू करत नसल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या खासगी नर्सिंग होमवर कारवाई करण्याची पालिका प्रशासनाची इच्छा नाही. परंतु महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या सूचनांकडे ते सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळे व त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यामुळे नर्सिंग होमचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत असल्याचं पालिकेने म्हटलं आहे. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नर्सिंग होम चालकांना आधी नोटीस द्या आणि मग कारवाई करा, असं आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे.


हेही वाचा -

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा खास आराखडा

Coronavirus Update: धारावीत ३४ नवे कोरोनाग्रस्त, एकूण संख्या २७५ वर

Coronavirus Updates: मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख, सरकारी नोकरी


पुढील बातमी
इतर बातम्या