मुंबईत कोरोनाचा उद्रेक, गुरूवारी तब्बल 'इतके' नवे रुग्ण

मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत कोरोना उद्रेक झाल्याचं दिसून येत आहे.  मुंबईत गुरूवारी कोरोनाचे तब्बल ८ हजार ६४६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह आजूबाजूच्या शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल की काय अशी शंका व्यक्त व्यक्त केली जात आहे. 

मुंबईत गुरूवारी ५ हजार ३१ रुग्ण बरे झाले आहेत.  मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ लाख ५५ हजार ६९१ वर पोहोचली आहे. तर एकूण मृतांचा आकडा ११ हजार ७०४ झाला आहे मुंबईतील रिकव्हरी रेट सध्या ८४ टक्के आहे.

ठाण्यात गुरूवारी तब्बल १ हजार ४३२ नवीन रुग्ण आढळले.  तर ५७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ६८ हजार ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गुरूवारी ५ मृतांची नोंद झाली आहे. आतापर्यंत ठाण्यात १३९५ रुग्णांनी जीव गमावला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात  ८९८ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३ मृतांची नोंद झाली आहे. ६८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ६९ हजार ९६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.


हेही वाचा -

  1. ठाणे जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री बंद
  1. अखेर 'सनराईज' रुग्णालयाला लागलं टाळं
पुढील बातमी
इतर बातम्या