Advertisement

ठाणे जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री बंद

कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ठाणे जिल्हा प्रशासनाने रात्री ८ वाजल्यानंतर लॉकडाऊन लागू केला आहे. या लॉकडाऊनविरोधात आता हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक संघटना आक्रमक झाल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री बंद
SHARES

कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ठाणे जिल्हा प्रशासनाने रात्री ८ वाजल्यानंतर लॉकडाऊन लागू केला आहे. या लॉकडाऊनविरोधात आता हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. आजपासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कुठेही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री केली जाणार नाही, असा निर्णय या संघटनांनी घेतला आहे.

ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई अशा सर्वच ठिकाणी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री बंद ठेवली जाणार आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सला भरावी लागणारी एक्साईज फी हफ्त्यांमध्ये भरण्याची मुभा द्यावी आणि संध्याकाळी ८ नंतर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रद्द करून व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी हॉटेल आणि रेस्टॉरंट्स व्यावसायिकांनी केली आहे. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं आहे.

ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३ लाखांच्या आसपास गेली आहे.  तर मृतांचा आकडा ५ हजारांच्या वर गेला आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा प्रशासनाला लॉकडाऊन अंतर्गत कठोर निर्बंध लागू करावे लागले. 



हेही वाचा -

  1. मालमत्ता कर थकवणाऱ्यांना दणका, सांडपाणी वाहून नेण्याचा मार्ग बंद

  1. अखेर 'सनराईज' रुग्णालयाला लागलं टाळं

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा