Advertisement

मालमत्ता कर थकवणाऱ्यांना दणका, सांडपाणी वाहून नेण्याचा मार्ग बंद

मुंबई महानगरपालिकेनं उत्पन्न वाढवण्यासाठी थकबाकीदारांकडून वसुली करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

मालमत्ता कर थकवणाऱ्यांना दणका, सांडपाणी वाहून नेण्याचा मार्ग बंद
SHARES

मुंबई महानगरपालिकेनं उत्पन्न वाढवण्यासाठी थकबाकीदारांकडून वसुली करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये मालमत्ता कर (Poperty Tax) थकवणारे नागरिक आणि आस्थापनं पालिकेच्या रडारवर आहेत.

काही दिवसांपूर्वी पालिकेनं कर चुकवेगिरी होणाऱ्या मालमत्तांचा पाणीपुरवठा बंद केला होता. आता या मालमत्तांची सांडपाणी वाहून नेणारे मार्ग बंद करण्यात येणार आहेत.

मुंबईतील अनेक मालमत्तांचा कर थकलेला आहे. या माध्यमातून पालिकेला जवळपास २० हजार कोटी रुपयांचा निधी येणे बाकी आहे. त्यामुळे आता पालिकेनं चार बडया थकबाकीदारांवर सर्वप्रथम कारवाईचा बडगा उभारला.

यामध्ये वांद्रे इथील के विभागातील एका हॉटेलचा समावेश आहे. या हॉटेलनं जवळपास ८.७ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. आगामी काळात मुंबईतील इतर थकबाकीदारांवरही अशाचप्रकारची कारवाई होण्याची शक्यता आहे.

गेल्या आर्थिक वर्षापासून मालमत्ता कर न भरणाऱ्यांची चल संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत दुचाकी, चारचाकी, विविध प्रकारची वाहने, टिव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा (A.C.) यासारख्या वस्तू जप्त करण्यात येत आहेत.

या वस्तू जप्त केल्यानंतर ५ दिवसांच्या आत थकीत कराची वसुली न झाल्यास सदर वस्तुंचा जाहीर लिलाव करुन त्याद्वारे थकीत कराची वसुली करण्याची तदतूद करण्यात आली आहे.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा