मुंबईतील 'ही' ठिकाणं कोरोनाचे नवे हॉटस्पॉट

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. सुरुवातीपासून मुंबईत धारावी आणि वरळी हे कोरोनाचे हाॅटस्पाॅट आहेत. या दोन ठिकाणी रुग्णांची संख्या मोठी होती. मात्र, आता या ठिकाणी कोरोनाला आटोक्यात ठेवण्यास पालिका प्रशासनाला यश आलं आहे. येथील रुग्णांची संख्या घटत आहे. मात्र, आता अंधेरी, जोगेश्वरी कोरोनाचे नवे हॉटस्पॉट ठरत असल्याचं समोर येत आहे.

 

पालिकेच्या के पूर्व वाॅर्डमध्ये अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी परिसर येतो. या परिसरातील रुग्णसंख्या आता ३७८२ झाली आहे. या परिसरात ७० टक्के भाग झोपडपट्टीचा असून  दाटीवाटीचा आहा. त्यामुळं या ठिकाणी कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. अंधेरी के पूर्व भागात एकाच दिवसात १६६ नवे रुग्ण आढळल्यानं हा भाग सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या भाग ठरतोय. अंधेरी, जोगेश्वरी भागात विमानतळ, एमआयडीसी असल्यानं कोरोनाच्या संसर्गाची भिती व्यक्त केली जात आहे.आतापर्यंत पहिल्या क्रमांकावर असलेला धारावी, माहिम, दादर हा परिसर दुसऱ्या क्रमाकांवर गेला. 

३ हजारांपेक्षा अधिक रुग्णांचे विभाग

के पूर्व (अंधेरी, जोगेश्वरी) - ३७८२

जी उत्तर ( धारावी, माहिम, दादर) - ३७२९

एल विभाग ( कुर्ला) - ३३७३

ई विभाग (भायखळा, मुंबई सेंट्रल) - ३१४४

के. पश्चिम (अंधेरी पश्चिम) - ३१३८

एफ उत्तर (माटुंगा, वडाळा) - ३१११


हेही वाचा -

दिलासादायक! तब्बल 'इतक्या' कॅन्सरग्रस्तांची कोरोनावर मात

सोमवारपासून ऑनलाइन शिक्षण सुरू; विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह


पुढील बातमी
इतर बातम्या