Advertisement

सोमवारपासून ऑनलाइन शिक्षण सुरू; विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह

दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष सोमवारपासून सुरूवात झाली आहे.

सोमवारपासून ऑनलाइन शिक्षण सुरू; विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह
SHARES

कोरोनामुळं मागील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सुट्टी मिळाली होती. परंतु, विद्यार्थ्यांच भवितव्य लक्षात घेता, राज्य सरकार व शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पावलं उचलण्यास सुरूवात केली. त्यानुसार, दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष सोमवारपासून सुरूवात झाली आहे. सोमवारपासून शालेय जगातील नव्या तंत्रस्नेही युगामध्ये मुले-मुली 'एंटर' होणार आहेत. या नव्या 'न्यू नॉर्मल'बाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उत्सुक असल्याचे चित्र आहे.

शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्‌भवू नये, यासाठी शाळांनी इंटरनेट, वायफाय सिस्टीम, लॅपटॉप, कम्प्युटर अशा पायाभूत सुविधांची तयारी केली आहे. तसंच, 'गुगल क्लासरूम'ची निर्मिती करण्यात आली आहे. मुख्याध्यापकांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांचं ऑनलाइन पद्धतीनं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी 'झूम'वर किंवा 'गुगल मीट'वर विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला आहे.

आगामी काळात ऑनलाइन पद्धतीनं शिक्षण घ्यायचं असल्यानं, आवश्यक असलेल्या पायाभूत गोष्टींची माहिती दिली आहे. साधारण ८ जूनपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. शालेय शिक्षण विभागानं 'दिक्षा ऍप'च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीनं शिक्षण देण्याला साधारण दीड महिन्यापूर्वी सुरुवात केली आहे. तर, 'बालभारती'नं इयत्ता १ली ते १२वीच्या पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफ विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहे.

पाठ्यपुस्तकांमधील 'क्यूआर कोड'च्या माध्यमातून शिक्षण सोपं करण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच अनेक खासगी शैक्षणिक अॅपनेही पालकांच्या मोबाइलमध्ये जागा मिळवली असून, त्यामार्फत अध्यापनाला सुरुवात केली आहे. तर, मुलांना शिक्षण घेण्यात कोणतीच अडचण येऊ नये, यासाठी पालकांनी स्वतःला 'टेक्नोसॅव्ही' बनवले आहे.



हेही वाचा -

मुंबईची लाइफलाइन पून्हा सुरू

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा