Advertisement

गुड न्यूज: मुंबई लोकल ट्रेन अखेर सुरू, पण..

सोमवारी पहाटेच्या सुमारास पहिली लोकल रुळावर धावली. मध्य रेल्वेवर २०० तर पश्चिम रेल्वेवर १२० लोकलच्या फेऱ्या होण्याची शक्यता आहे.

गुड न्यूज: मुंबई लोकल ट्रेन अखेर सुरू, पण..
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील २ महिने बंद असलेली मुंबईची लाईफलाईन सोमवारपासून पून्हा सुरू झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच केवळ या लोकलमधून प्रवास करता येणार आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास पहिली लोकल रुळावर धावली. मध्य रेल्वेवर २०० तर पश्चिम रेल्वेवर १२० लोकलच्या फेऱ्या होण्याची शक्यता आहे. मुंबईतील लोकल सुरु करावी याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबईची लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाला आळा घालावा यासाठी लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे. त्यानुसार, पोलीस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई कर्मचारी, तसेच उर्वरित पालिका कर्मचारी, पत्रकार या काही ठराविक लोकांना करता येणार आहे. सर्व सामान्यांना या लोकलचा वापर करता येणार नाही.

पश्चिम रेल्वे

  • पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते डहाणू मार्गावर एकूण ७३ गाड्या धावणार आहेत. 
  • ८ गाड्या या विरार आणि डहाणू रोड या स्थानकादरम्यान धावणार आहेत.
  • सकाळी ५.३० ते रात्री ११.३० पर्यंत या लोकल गाड्या सुरु राहणार आहेत.
  • अनेक लोकल गाड्या चर्चगेट ते विरारपर्यंत धावणार आहे. 
  • काही लोकल गाड्या या डहाणूपर्यंत धावणार आहेत.
  • चर्चगेट ते बोरिवली दरम्यान काही जलद लोकल सुरु धावणार आहे. 
  • बोरिवलीनंतर त्या पुढील स्थानकात धिम्या गतीने धावणार आहेत.


मध्य रेल्वे

  • मध्य रेल्वेवर लोकलच्या एकूण २०० सेवा चालवल्या जाणार आहे. 
  • १०० अप मार्गावर आणि १०० डाऊन मार्गावर लोकल धावणार आहेत.
  • सीएसएमटी ते कसारा, कर्जत, कल्याण, ठाणे या स्थानकादरम्यान १३० लोकल धावणार आहेत. 
  • यामधील ६५ या अप, तर उर्वरित ६५  या डाऊन मार्गावर धावणार आहेत.
  • काही प्रमुख स्थानकांवर या लोकल थांबवल्या जातील.


लोकल प्रवासाचे नियम

  • लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. 
  • सामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवास करता येणार नाही.  
  • या प्रवाशांना तिकीटासाठी तिकीट खिडक्या उघडल्या जाणार आहे. 
  • संबंधित कर्मचाऱ्यांनी शासकीय ओळखपत्र दाखवल्यास त्याला तिकीट मिळणार आहे. 
  • पासधारक तिकिटांची वैधता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या आयडी कार्डच्या माध्यमातून त्यांना स्थानकांवर प्रवेश दिला जाईल. 
  • कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड आधारित ई-पास दिले जातील. 
  • जे कर्मचारी वैद्यकीय दृष्ट्या सुदृढ आहेत. त्याच व्यक्तींना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. 
  • कंटेन्मेंट झोनमधून कर्मचारी कामावर येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
  • ट्रेनमध्ये तसेच लोकलमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • रेल्वे स्टेशन परिसरात 150 मीटरपर्यंत ना फेरीवाला आणि नो पार्किंग क्षेत्र असणार आहे.
  • प्रत्येक स्टेशनबाहेर इमर्जन्सी सेवा म्हणून रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे.



हेही वाचा -

सुशांतनं आत्महत्येपूर्वी 'या' अभिनेत्याला केला होता फोन, पण...

मी ‘राजनिष्ठ’, राज ठाकरेंच्या वाढदिवसाला नांदगावकरांची भावनिक पोस्ट



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा