Advertisement

सुशांतनं आत्महत्येपूर्वी 'या' अभिनेत्याला केला होता फोन, पण...

आत्महत्येपूर्वी सुशांतनं एका अभिनेत्याला कॉल केला होता. ज्यानं सुशांतसोबत मालिकेत काम केलं होतं. पण...

सुशांतनं आत्महत्येपूर्वी 'या' अभिनेत्याला केला होता फोन, पण...
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आतम्हत्येनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या ३४ व्या वर्षी आणि यशाच्या शिखरावर असताना सुशांतनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणं सर्वांसाठीच धक्कादायक आहे. त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस (Mumbai Police) अधिक तपास करत आहेत.

सुशांतचा मृतदेह विले पार्ले इथल्या कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. त्यानंतरच अधिक माहिती समोर येईल. पोलिसांनी त्याच्या घरातले काही कागदपत्र, तो घेत असलेली औषधं आणि त्याचा फोन जप्त केला होता. 

पोलिसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड्स तपासले. त्यामुळे आता माहिती मिळत आहे की, आत्महत्येपूर्वी सुशांतनं त्याच्या एका मित्राला कॉल केला होता. महेश शेट्टी असं त्याच्या मित्राचं नाव आहे. शनिवारी रात्री सुशांतनं महेश शेट्टीला कॉल केला होता. पण महेश शेट्टी कॉल उचलू शकला नाही.  पण दुसऱ्या दिवशी त्याच्या आत्महत्येची बातमी समोर आली.

महेश शेट्टी देखील एक टीव्ही अभिनेता आहे. पवित्र रिश्ता या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. तो सुशांतचा खूप जवळचा मित्र आहे. सुशांत त्याच्याशी सर्व गोष्टी शेअर करायचा. 


महेश शेट्टी (Mahesh Shetty) शिवाय त्यानं आपल्या बहिणीला कॉल केला होता. महेशला कॉल करण्याआधी त्यानं आपल्या बहिणीला कॉल केला होता. आता पोलिस त्याचा फोन तपासत आहेत. तो गेल्या २-३ दिवसात कोणासोबत बोलला याची माहिती पोलिस घेत आहेत.

दरम्यान, वांद्रे पोलिस त्याच्या मित्रांची चौकशी करत आहेत. सुशांतनं आत्महत्या केली त्यावेळी त्याचा एक मित्र घरात होता. याशिवाय ३ नोकर घरात होते. त्याच्या मित्रानुसार, शनिवारी रात्री सुशांत आणि तो एकत्र जेवले. त्यानंतर सुशांत त्याच्या रुममध्ये गेला. सकाळी मित्रांनी आवाज दिला असता त्यानं दरवाजा उघडला नाही. त्यामुळे दरवाजा तोडला तेव्हा सुशांतचा मृतदेह आढळला. 

सुशांतच्या घरात काही कागदपत्रे देखील सापडली आहेत, ज्याद्वारे समजते की, तो नैराश्यावर उपचार करीत होता. गेले सहा महिने तो नैराश्यात होता. या नैराश्यातून (Depression) त्यानं आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. पण त्याच्या नातेवाईकांनी सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, असा दावा केला आहे. 




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा