Advertisement

मी ‘राजनिष्ठ’, राज ठाकरेंच्या वाढदिवसाला नांदगावकरांची भावनिक पोस्ट

राज ठाकरे यांच्या प्रत्येक जाहीर कार्यक्रम, दौऱ्यात सावलीसारखी साथसोबत करणारे अत्यंत जवळचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील राज ठाकरे यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मी ‘राजनिष्ठ’, राज ठाकरेंच्या वाढदिवसाला नांदगावकरांची भावनिक पोस्ट
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज १४ जून २०२० रोजी वाढदिवस असल्याने राज्यातील तमाम महाराष्ट्र सैनिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा वाढदिवस साजरा न करण्याचं राज ठाकरे यांनी ठरवलं असून मित्रमंडळी, शुभचिंतक आणि कार्यकर्त्यांनी घरूनच शुभेच्छा द्याव्यात असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानुसार घरी राहूनच परंतु साेशल मीडियावरून कार्यकर्ते, शुभचिंतक निरनिराळ्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देत आहेत.

याचप्रकारे राज ठाकरे यांच्या प्रत्येक जाहीर कार्यक्रम, दौऱ्यात सावलीसारखी साथसोबत करणारे अत्यंत जवळचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील राज ठाकरे यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा (mns leader bala nandgaonkar emotional post on facebook on raj thackeray birthday ) दिल्या आहेत. नांदगावकर यांनी आपल्या फेसबुकवर अत्यंत भावनिक पोस्ट टाकत राज ठाकरे आणि त्यांच्यातील नातं उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा- यंदा वाढदिवस साजरा करणार नाही, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये बाळा नांदगावकर लिहितात की, सुदामा ची ओळख ही जगाला कृष्णप्रेमा मुळे आहे, सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीचे दाखले हे हजारो वर्षे झाली तरी सातत्याने लोक अजून ही देत असतात. सुदामा कडे निखळ प्रेमाशिवाय कृष्णाला देण्यासारखे काहीच नव्हते, तरीसुद्धा भगवान कृष्णाचे सुदामा प्रेम हे सगळ्यात जास्त होते. मी सुद्धा आज राजकीय, सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात जे काही आहे ते साहेबांमुळेच, माझ्याकडेसुद्धा साहेबांना देण्यासारखे म्हणजे माझी "निष्ठा" जी मी कधीच अर्पण केली आहे. मला खुप आनंद आहे की माझी सर्वात मोठी ओळख "राजनिष्ठ" अशीच आहे. साहेबांचा लाभलेला अनेक दशकांचा सहवास, वेळोवेळी त्यांनी दिलेले प्रेम, त्यांनी दाखवलेला मार्ग, या सर्व गोष्टी म्हणजे माझ्यासारख्या सुदामाचे "राजधन". योगायोग असा ही आहे की साहेबांच्या निवासस्थानाचे नाव सुद्धा "कृष्णकुंज"च आहे. या लॉकडाऊनमुळे साहेबांना या दिवशी राज्यभरातून शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हजारो लोकांची या वर्षी ही प्रेमळ भेट होणार नाही व त्यामुळे सर्वांच्या मनात या वर्षी एकच ओळ नक्की असणार आहे...

" साहेबा प्राण तळमळला"

पण हा दुरावा तात्पुरता असून साहेब आणि आपण सर्वजण मिळून लवकरच मार्गक्रमण करून जनतेच्या हिताचे काम करू.

आज साहेबांच्या जन्मदिनी मी एकच सांगेन

"तुम्हे और क्या दू मै दिल के सिवाय, तुमको हमारी उमर लग जाए"

हेही वाचा - राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजपर्यंत पोहोचला कोरोना... पण,


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा