Advertisement

यंदा वाढदिवस साजरा करणार नाही, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा वाढदिवस साजरा करणार नाही, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
SHARES

देशावर सध्या कोरोनाव्हायरसचं संकट (Coronavirus Update) आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना (COVID 19) रुग्णांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सर्वात जास्त रुग्ण मुंबईत असल्याचं समोर येत आहे. सर्व परिस्थितीत पाहता मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज ठाकरे यांनी शुक्रवारी यासंदर्भात एक पत्र पार्टीच्या कार्यकर्त्यांना लिहलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जूनला वाढदिवस असतो. पण कोरोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे तिथेच जनतेला मदत करा, अशा सूचना देणारं जाहीर पत्रच कार्यकर्त्यांना उद्देशून राज यांनी लिहिलं आहे.

ते पत्रात हे देखील म्हणाले की, ज्या प्रकारे आपण दरवर्षी भेटतो तशी भेट आपली यावर्षी शक्य नाही. आपल्या सगळ्यांना सध्याच्या परिस्थितीची जाणीव आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर अजूनही बऱ्याच जणांचा जीव धोक्यात आहे. अशा या चिंतेच्या वातावरणात वाढदिवस साजरा करणं योग्य नाही. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येण्यापेक्षा तुमच्या परिसरातील नागरिकांना मदत करा. हेच माझ्यासाठी वाढदिवसाचं भेट आहे असं समजा. सोबतच तुम्ही स्वत:ची आणि तुमच्या कुटुंबियांची देखील काळजी घ्या. जेव्हा परिस्थिती पूर्णपणे सामान्य होईल तेव्हा, मी स्वत: तुम्हाला भेटण्यासाठी येईन. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा.

आपल्या कार्यकर्त्यांना 'महाराष्ट्र सैनिक' म्हणून संबोधित करताना ते म्हणाले की, ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घातला आहे. अनेकांनी आपल्या खिशातून पैसे खर्च करून लोकांची मदत केली आहे. पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण देखील झाली. मला माझ्या या महाराष्ट्र सैनिकांचा अभिमान आहे. 

पुढे ते म्हणाले की, मार्चपासून आपण कोरोनव्हायरस (साथीचा रोग) साथीच्या आजारानं ग्रस्त आहोत. यामुळे अर्थात आपले आयुष्य प्रचंड बदलले आहे. आजही या आजाराची तीव्रता कमी झाली नाही. यापूर्वी मी माझ्या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत नमूद केलं आहे की, जोपर्यंत यावर लस किंवा उपचार मिळत नाही, तोपर्यंत जगण्यासाठी आपली स्वतःची मानसिक आणि शारीरिक तयारी करावी लागेल.



हेही वाचा

मजुरांच्या नोंदणीचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, मनसेच्या मागणीला यश

ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी मनसेचं 'हॉर्न बजाओ' आंदोलन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा