Advertisement

कोरोना सोबत जगताना काय करायचं? मुख्यमंत्री म्हणाले...

कोरोना विषाणू गुणाकाराने वाढतो, त्यामुळे आपणा सर्वांना स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे. संपूर्ण जगात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. कोरोना सोबत जगताना नागरिकांना स्वयंशिस्त पाळावी लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोना सोबत जगताना काय करायचं? मुख्यमंत्री म्हणाले...
SHARES

रुग्णालयांच्या उभारणीसाठी चीनचं उदाहरण दिले जातं, पण मुंबईत बीकेसी इथं अवघ्या १५ दिवसांत देशातलं पहिलं फिल्ड हॉस्पिटल (maharashtra cm uddhav thackeray inaugurates vipro  public private Covid-19 ) उभारण्यात आलं आणि १००० बेड्सची सोय करण्यात आली. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईला ३ महिने होत आहेत, याकाळात राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधांची निर्मिती होत असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. शिवाय कोरोना सोबत जगताना नागरिकांना स्वयंशिस्त पाळावी लागेल, असंही ते म्हणाले.

पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड आरोग्य केंद्राचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन हस्तांतरण झालं, त्यावेळी ते बोलत होते.

पुरेशा सुविधा

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून ते आजची परिस्थिती यामध्ये आपण सुधारणा करीत फार पुढे गेलो आहोत. राज्यात सुरूवातीच्या टप्प्यात केवळ दोनच चाचणी केंद्र होते. सद्यस्थितीत ८० हून अधिक चाचणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. लवकरच ही संख्या १०० च्या पुढं जाईल.  कोरोना विषाणू हा संपूर्ण जगासाठी नवीन आहे. कोरोनाच्या विरुध्द लढाई लढत असताना वेळेवर सुविधा निर्माण कराव्या लागल्या असून त्यात आपल्याला यश येत आहे, ही सकारात्मक बाब आहे. सुरुवातीला आपल्याकडे ३५० आयसोलेशन बेड होते. आजच्या घडीला आयसीयू, आयसोलेशन, ऑक्सीजनयुक्त पुरेशा प्रमाणात सर्व बेड उपलब्ध आहेत.

हेही वाचा- ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी मनसेचं 'हॉर्न बजाओ' आंदोलन

स्वयंशिस्तीची गरज

कोरोना विषाणू गुणाकाराने वाढतो, त्यामुळे आपणा सर्वांना स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे. संपूर्ण जगात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. कोरोना सोबत जगताना नागरिकांना स्वयंशिस्त पाळावी लागेल. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधायुक्त असलेल्या रुग्णालयाची उभारणी विप्रोने केली असून त्याचा निश्चितच भविष्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे करण्यासाठी उपयोग होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मुंबईचं उदाहरण

रुग्णालयांच्या उभारणीसाठी चीनचे उदाहरण दिले जातं, पण मुंबईत बीकेसी येथे अवघ्या १५ दिवसांत देशातले पहिले फिल्ड हॉस्पिटल उभारलं आणि १००० बेड्सची सोय केली. गोरेगावला नेस्को येथे जम्बो सेंटर सुरु. नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रातील कोविड सेंटरही सुरु होणार आहे. 

केवळ फिल्ड हॉस्पिटल्स उभारून चालणार नाही तर त्यात काम करायला डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ लागणार. तो देखील सर्व माध्यमांतून आम्ही तयार करीत आहोत. लॉकडाऊन उघडायला सुरुवात केल्यामुळे आमच्यासमोर आव्हान. पण, सर्वांच्या मदतीने ते निश्चितपणे पेलू, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा