Advertisement

ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी मनसेचं 'हॉर्न बजाओ' आंदोलन

वाहतूक व्यवसायात कार्यरत असलेल्या प्रत्येकाचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी मनसेचं 'हॉर्न बजाओ' आंदोलन
SHARES

लॉकडाऊन दरम्यान वाहतूक व्यवसाय मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे  ठाकरे सरकारविरोधात मनसे वाहतूक सेना अभिनव आंदेलन करणार आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच १२ जूनला सायंकाळी ५ वाजता मनसे वाहतूक सेना आंदोलन करणार आहे. यासाठी सायंकाळी ५ वाजता १ मिनिटांसाठी हॉर्न वाजवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वाहतूक व्यवसायात कार्यरत असलेल्या प्रत्येकाचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचावा, हा या मागचा उद्देश आहे.

दोन महिन्याहून अधिक काळ लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळे टॅक्सी, रिक्षा चालक आणि या क्षेत्रातील इतरांचं अधिक नुकसान झालं. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अशात वाहतूक व्यवसाय मेटाकुटीला आला असताना सरकार त्याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे.

'या' आहेत मागण्या

  • वाहतूक क्षेत्राला दिलासा देणारं धोरण जाहीर करावं
  • ओला-उबर प्रमाणे रिक्षा टॅक्सी चालकांना सामान्य प्रवासी वाहतुकीची परवानगी द्यावी
  • वाहतूक क्षेत्राला आर्थिक मदत जाहीर करावी.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर ओला-उबर सारख्या टॅक्सीसेवांना परवानगी देण्यात आली. पण या क्षेत्रातील इतर घटकांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे सरकारनं तातडीनं वाहतूक क्षेत्राला आर्थिक मदत जाहीर करावी. याच समस्या सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी मनसे वाहतूक सेनेचे संजय नाईक यांनी हे आंदोलन जाहीर केलं आहे. या आंदोलना अंतर्गत सगळ्यांनी १ मिनिटं हॉर्न वाजवायचा आहे.

'वाहतूक व्यवसायातील सर्वांचा आक्रोश बहिऱ्या राज्य सरकारच्या कानावर जावा, झोपेचं सोंग घेतलेलं राज्य सरकार खडबडून जाग व्हावं, यासाठी शुक्रवार १२ जूनला संध्याकाळी ठीक ५ वाजता सर्वांनी फक्त १ मिनिट हॉर्न वाजवायचा आहे. या आंदोलनाद्वारे वाहतूकदारांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवायचा आहे', असं आवाहन नाईक यांनी केलं. या आंदोलनासाठी मनसेने #MNSHornOKPlease हा हॅशटॅगही तयार केला आहे.



हेही वाचा

तर पुन्हा लाॅकडाऊन करावं लागेल, उद्धव ठाकरेंचा इशारा

पंतप्रधान मोदींनी थाेडं महाराष्ट्रावरही ‘प्रेम’ दाखवावं- शरद पवार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा