Advertisement

पेट्रोल-डिझेलवर नाही, तर दारुवर कर वाढवा : बाळा नांदगावकर

पेट्रोल-डिझेलवर नाही तर दारुवर कर वाढवा अशी मागणी मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

पेट्रोल-डिझेलवर नाही, तर दारुवर कर वाढवा : बाळा नांदगावकर
SHARES

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. पण यामुळे अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. लॉकडाऊनमुळे सरकारचा महसूल कमी झाला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर वरचा व्हॅट सरकारनं २ रुपयांनी वाढवला होता. मनसेनं सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. पेट्रोल-डिझेलवर नाही तर दारुवर कर वाढवा अशी मागणी मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

सरकारनं महिनाभरापूर्वीच दारु विक्रीला परवानगी दिली होती. त्यानंतर वाईन शॉप्सवर देशभर प्रचंड गर्दी झाली होती. अनेक राज्य सरकारांनी दारुवर भरमसाठ करही लादला होता. तोच धागा पकडत बाळा नांदगावकर यांनी ही मागणी केली आहे.

बाळा नांदगावकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, महसूल तूट भरून काढण्यासाठी राज्यसरकारने नुकतीच पेट्रोल व डिझेल वर 2 रुपये मूल्यवर्धित कर (VAT) वाढवला. सरकारनं याऐवजी मद्यावरील कर वाढवावा हे मार्च महिन्यापासून सुचवित आहे कारण आधीच आपल्या राज्यात इंधनाचे दर ईतर अनेक राज्यांपेक्षा जास्त आहेत व त्यात हा अधिभार.

दरम्यान, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलची मागणीत सुधारणा होत आहे. याच दरम्यान कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ४० डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान जवळपास गेल्या ८० दिवसांत तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केला नाही. इंधनाच्या किंमतीत शेवटचा बदल १६  मार्च रोजी झाला होता. त्यानंतर रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत प्रति लिटर ६०-६० पैशांची वाढ करण्यात आली होती.

इंधनाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली नव्हती. पण आता पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता असून पेट्रोल-डिझेलच्या दरात सोमवारी वाढ झाली आहे. आज पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले आहे. मुंबईत पेट्रोल ५८ पैशांनी महागल्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी ७९.४९ रुपये मोजावे लागत आहेत. ५८ पैशांची वाढ डिझेलच्या दरातही झाल्यामुळे डिझेलचा दर मुंबईत ६९.३७ रुपयांवर गेला आहे.



हेही वाचा

सोनू सूद प्रकरणावरून फडणवीसांनी मानले चक्क शिवसेनेचे आभार

लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलंय, राजू पाटील यांची टीका

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा