Advertisement

Cyclone nisarga: ‘त्यांना’ही आश्रय द्या, अमित ठाकरेंचं जनतेला आवाहन

या चक्रीवादळाच्या संकटात कुणी अडकलं तर त्याची पुढं होऊन मदत करण्याचं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केलं आहे.

Cyclone nisarga: ‘त्यांना’ही आश्रय द्या, अमित ठाकरेंचं जनतेला आवाहन
SHARES
Advertisement

पुढील काही तासांत मुंबई, ठाण्यात निसर्ग चक्रीवादळ येऊन धडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईत आपात्कालीन परिस्थिती उदभवल्यास त्याचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले असून मुंबईतील ६ समुद्र किनाऱ्यांवर ९३ जीवरक्षकांना तैनात करण्यात आलं आहे. शिवाय मुंबई महापालिकेतर्फे सुमारे ३५ शाळांमध्ये नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. तरीही या चक्रीवादळाच्या संकटात कुणी अडकलं तर त्याची पुढं होऊन मदत करण्याचं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे (mns leader amit thackeray wrote a open letter to people ahead of cyclone nisarga) यांनी केलं आहे. 

मनसे नेते अमित ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. या पत्रात ते म्हणतात की, कोरोना संकटावर मात करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करत असतानाच आणखी एक नवं संकट आपल्यापुढं येऊन उभं राहिलं आहे. हे संकट आहे चक्रीवादळाचं.

हेही वाचा - Cyclone Nisarga: महापालिकेच्या ३५ शाळांमध्ये राहण्याची सोय

गरजूंना मदत करा

या चक्रीवादळाच्या अतिवेगवान वाऱ्यांमुळे गरीब आणि बेघर लोकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. फक्त माणसांनाच नव्हे, तर रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांनाही त्याचा फटका बसणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, रस्त्यावरच्या प्राण्यांना तुमच्या इमारतीच्या आवारात आश्रय घेऊ द्या, त्यामुळे ते सुरक्षित राहतील. मला पूर्ण कल्पना आहे की अनोळखी लोकांना इमारतीत घेणं आपल्यापैकी अनेकांना शक्य होणार नाही. पण एकदा की हे चक्रीवादळाचं संकट निघून गेलं की आपण सर्वांनी घराबाहेर पडून गरजूंना मदत करायला हवी. कुणाला जेवण तर कुणाला औषधं उपलब्ध करून द्यायला हवी. एक जबाबदार नागरिक म्हणून या आपल्याला जे काही मदतकार्य करणं शक्य आहे, ते आपण करायला हवं, असं आवाहन अमित ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.  

महापालिकेच्या शाळा

आवश्यकता लागल्यास नागरिकांना मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरित होण्याचं आवाहन मुंबई पोलीस आणि महापालिकेकडून करण्यात येत आहे. माहीम पथ्थरवाडी येथील २५० लोकांना काॅज वे येथील महापालिका शाळेत हलवण्यात आलं आहे. आपत्कालीन स्थितीत मुंबईकर नागरिक हेल्पलाईन क्रमांक १९१६ डायल करून त्यानंतर ४ दाबून आवश्यक ती मदत मागू शकतात, असं सांगण्यात आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement