मुंबईत पुन्हा रक्ताचा तुटवडा

मुंबईत पुन्हा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाच्या काळात सुरक्षित वावराच्या नियमामुळे रक्तदान शिबिरं घेता येत नाहीत. तसंच  अनेक रक्तपेढ्या या रुग्णालयांमध्ये असल्याने तिथे जाण्याची रक्तदात्यांची तयारी नाही. यामुळे मुंबईत रक्ताची कमतरता भासत आहे. याआधीही मुंबईत रक्ताची तूट निर्माण झाली होती. मात्र, आरोग्ययंत्रणेसह विविध सामाजिक संस्थांनी केलेल्या प्रयत्नांमुळे रक्ताची उपलब्धता झाली होती.  

सध्या सरकारी रक्तपेढ्यांमध्ये सर्वांत कमी रक्ताची उपलब्धता आहे. लो. टिळक रुग्णालयात सर्वाधिक तुटवडा असल्याचं दिसून आलं आहे. लो. टिळक रुग्णालयात २८० थॅलेसेमिया रुग्णांना रक्त द्यावे लागते. बोरिवली येथे सुरू केलेल्या थॅलेसेमिया केंद्रामध्येही १०० रुग्णांना ररक्त द्यावे लागते. मात्र तिथेही पुरेसे रक्त नाही. 

 राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ. अरुण थोरात यांनी रक्ततुटवडा असल्याचं मान्य केलं आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. 

रक्ताची उपलब्धता

रक्तपेढी - ए +- बी + - एबी + - ओ +- एकूण

कूपर - ६ - २- ० - ७- १५

जीटी - ४ - २- १- २- ९

रेड क्रॉस- १३ - ० - ०-०-०- १३

के. बी. भाभा - ३ -०- २- ५- १०

राजावाडी - ५ -३- ५ - ३- १६

कामा - ९ -०-०-४-१३

शताब्दी - ४-५ -६ -१२-२७

केईएम -    ३० - ७- १२ - ८ - ५७

जेजे - ३१ - १५ - ८-५ - ५९

नायर - ५ -२७ -७-२० -५९

लो. टिळक - १- ०- २-३- ६


हेही वाचा -

मुंबईतील कोरोनामुक्तांचं प्रमाण ८२ टक्क्यांवर

लाॅकडाऊनचे उल्लघंन केल्याप्रकरणी राज्यात २ लाख गुन्हे दाखल


पुढील बातमी
इतर बातम्या