बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेडून मार्गदर्शक सूचना जाहीर

बर्ड फ्लू रोगाचा वाढता पादुर्भाव पाहता मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. राज्य सरकारचा पशुसंवर्धन विभाग आणि पालिका यांच्या समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. 

मुंबईत पक्ष्यांचे मृत्यू झाल्यास पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या १९१६ या मदत क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे. हेल्पलाईन वर आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्षाद्वारे त्या विभागातील घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या  कार्यरत सहाय्यक अभियंता यांना कळवतील. त्यानंतर विभाग कार्यालयातील त्या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील कर्मचारी या पक्षांची विल्हेवाट मार्गदर्शक सूचनेप्रमाणे लावतील. तत्काळ प्रतिसाद पथकातील डॉ. हर्षल भोईर (९९८७२८०९२१) आणि डॉ. अजय कांबळे (९९८७४०४३४३)यांचेही क्रमांक पालिकेने जाहीर केले आहेत.

याशिवाय पालिकेने चिकन विक्रेत्यांना सरकारनं आखून दिलेली नियमावली पाळण्याचे निर्देश दिले आहेत. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक तेथे स्थलांतरित पक्षांची तपासणी करण्यात येणार आहे. परराज्यातील कोंबड्यांना बंदी घालण्यात आली आहे.  शिवाय ज्या ठिकाणी पक्षांचा संशयास्पद मृत्यू होईल त्या ठिकाणी तातडीने तपासणी करण्याचे आदेश पशु संवर्धन विभागाने दिले आहेत.

 देशात आतापर्यंत १० राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. रविवापर्यंत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात व उत्तर प्रदेश या ७ राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाला होता. सोमवारी दिल्ली, उत्तराखंड व महाराष्ट्रत तो आढळून आला. 


पुढील बातमी
इतर बातम्या