जगभरात कोरोना प्रादुर्भावापाठोपाठ आता मंकीपॉक्सनं धाकधूक वाढवली आहे. मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. WHOच्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य जुनोटिक रोग आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात.
सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र इतर देशांतील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारसह पालिकेनं देखील सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मंकीपॉक्सवर एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की विमानतळ अधिकारी स्थानिक आणि स्थानिक नसलेल्या देशांतील प्रवाशांची तपासणी करत आहेत.
पालिकेने संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी, नागरी संचालित कस्तुरबा रुग्णालयात 28 खाटांचा स्वतंत्र वॉर्ड तयार केला आहे. तसेच चाचणीचे नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठवले जातील.
विमानतळ अधिकारी स्थानिक आणि स्थानिक नसलेल्या देशांतील प्रवाशांची तपासणी करत आहेत. संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी कस्तुरबा रुग्णालयात २८ खाटांचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. तसंच चाचणीचे नमुने एनआयव्हीकडे पाठवले जातील.
जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्र सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेत आंतरराष्ट्रीय विमानतळं, बंदर आणि देशाच्या सीमाभागांत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान महाराष्ट्रात राज्य सरकारने देखील अॅडव्हायझरी जारी केली आहे.
तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.
हेही वाचा