Advertisement

जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येणार?, राजेश टोपे म्हणाले...

राज्यात सध्या मास्क सक्ती नसली तर मास्क वापरण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येणार?, राजेश टोपे म्हणाले...
SHARES

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. चौथी लाट कदाचित जरी जून-जुलै महिन्यात येईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या चौथ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरण हेच एकमेव पाऊल आहे. लसीकरण वाढवण्यासाठी अधिक भर दिला जात आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं. तसंच नागरिकांना पुन्हा एकदा लसीकरणाचं आवाहन केलं आहे.

ते पुढे म्हणाले की, "लसीकरणाबाबत रिफ्युजल टेन्डेन्सी काही लोकांची असते, जे नाही म्हणतात, येत नाहीत किंवा सहकार्य करत नाहीत, अशा लोकापर्यंत जाऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. या टेन्डेन्सीमुळे 18 ते 60 वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचं प्रमाण कमी दिसतं. त्याबाबतीतही जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे."

राज्यात सध्या मास्क सक्ती नसली तर मास्क वापरण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. "पुढील काळात जर कोरोना संसर्ग कमी होत असल्याची सकारात्मक आकडेवारी आली तर मास्क संदर्भातील पुढील निर्णय घेतला जाईल," असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.हेही वाचा

गुड न्यूज! आता मुंबईकरांना 'या' केंद्रावर मोफत बुस्टर डोस मिळण्याची शक्यता

मॉल्स, सिनेमा हॉलमध्ये मास्क बंधनकारक करण्याचा टास्क फोर्सचा सल्ला

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा