Advertisement

मॉल्स, सिनेमा हॉलमध्ये मास्क बंधनकारक करण्याचा टास्क फोर्सचा सल्ला

मंगळवारी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा १०० च्या पार गेला. 57 दिवसांनंतर मुंबईत १०० पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले आहेत.

मॉल्स, सिनेमा हॉलमध्ये मास्क बंधनकारक करण्याचा टास्क फोर्सचा सल्ला
SHARES

कोरोना रुग्णांच्या आकड्यामध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा १०० च्या पार गेला. 57 दिवसांनंतर मुंबईत १०० पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhva Thackeray with Task Force) यानी टास्क फोर्सची बैठक घेतली.

बैठकीत राज्यात पुन्हा बंदीस्त ठिकाणी मास्क वापरण्याची सक्ती केली जावी, असा सल्ला देण्यात आला आहे. टास्क फोर्सनं तशी शिफारस या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी यांच्यासह टास्क फोर्समधील इतर सदस्य या बैठकीला हजर होते.

कोविड-19 टास्क फोर्सनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सिनेमा हॉल, नाट्यगृहे आणि मॉल्स यांसारख्या मर्यादित ठिकाणी मास्क अनिवार्य केले जावेत असा सल्ला दिला. तसंच लसीकरण मोहिमेला वेग दिला पाहिजे, पण जीनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असंही त्यात म्हटलं आहे.

तसंच अनेक कोरोना रुग्ण घरच्या घरीच टेस्ट (Corona Home Testing kit) करुन घरच्या घरीच उपचार घेत आहेत. अशा रुग्णांना क्वारंटाईन करणं गरजेचं असल्याचंही मत या बैठकीत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. पण तसं होत नसल्याचंही टास्क फोर्सकडून सांगण्यात आलंय.

यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडणार आहे.

दरम्यान, २५ एप्रिलच्या तुलनेत मुंबईत थेट दुप्पट रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. २५ एप्रिलला ४५ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर २६ एप्रिल रोजी पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत १०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ८५ रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता सहा ते बारा वर्ष वयाच्या मुलांनाही कोरोना लस देण्यात मंजुरी देण्यात आली आहे. कोवॅक्सिनच्या वापराला उपचारादरम्यान वापरसााठी मंजुरी देण्यात आली आहे.



हेही वाचा

'या' वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या को-वॅक्सिनला आपत्कालीन मंजुरी

मास्क वापरासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा