Advertisement

मास्क वापरासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य...

मुंबई, पुणे, नाशिक आणि अहमदनगरमध्ये सक्रिय कोविड १९ प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

मास्क वापरासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य...
SHARES

मुंबई, पुणे, नाशिक आणि अहमदनगरमध्ये सक्रिय कोविड १९ प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णसंख्येत काहिशी वाढ होत असली तरी काळजीचे कारण नाही. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. मात्र, राज्यात मुखपट्टी वापराची सक्ती पुन्हा करण्याची गरज नसली तरी गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं आवश्यक आहे.

राज्य सरकार सध्याच्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि परिस्थितीच्या आधारे ते "योग्य वेळी योग्य निर्णय" घेतील, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविड प्रकरणांच्या वाढीचा आढावा घेण्यात आला. त्यात असा निष्कर्ष काढण्यात आला की, परिस्थिती नियंत्रणात आहे. नियंत्रण ठेवा आणि घाबरण्याची गरज नाही, असं राजेश टोपे बोलले.  

महाराष्ट्रात १३ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान ८७९ नवीन रुग्ण आढळले. राज्यात अजूनही ६९० सक्रिय रुग्ण असताना मृत्यूदर १.८७ टक्के आहे.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्य सरकार सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि प्रचलित परिस्थितीच्या आधारे “योग्य वेळी योग्य निर्णय” घेईल. महाराष्ट्रात मास्क घालणे बंधनकारक नसताना, मंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिक आणि आजार असलेल्या व्यक्तींनी सावधगिरी म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे.

पुढे त्यांनी सांगितलं की, “मुंबई, पुणे, नाशिक आणि अहमदनगरमध्ये सक्रिय कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. तर एकट्या मुंबईत ८५ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं की, राज्यात अद्याप मास्कमुक्ती घोष्त केली नाही, फक्त त्याचा वापर अनिर्वाय नाही.

ते म्हणाले की, १२-१५ वयोगटातील १५-१८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची गती वाढवणं आवश्यक आहे. यावर राज्य मंत्रिमंडळाचेही एकमत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला अधिक प्रयत्न करण्यास सांगितलं जाईल. बूस्टर डोस अनिवार्य नाही पण ज्यांना ते घ्यायचे आहे ते खाजगी रुग्णालयांमध्ये योग्य तपासणी केल्यानंतर घेऊ शकतात.

टोपे म्हणाले की, राज्य सरकार कोविड-संक्रमित व्यक्तींच्या जवळच्या आणि दूरच्या संपर्कांची चाचणी घेण्यासारख्या प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत आहे.

“आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. युरोप, चीन आणि काही प्रमाणात दिल्लीत प्रकरणे वाढत आहेत. केंद्र सरकार, ICMR, आमचे टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग लक्ष ठेवत आहेत. परिस्थितीनुसार आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ,” असं ते पुढे म्हणाले.



हेही वाचा

धारावीतल्या 'या' केंद्रावर सोमवारपासून विनामूल्य बूस्टर डोस

कोरोनाचा संसर्ग वाढतोय, केंद्राचं ‘या’ ५ राज्यांना पत्र

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा