Advertisement

धारावीतल्या 'या' केंद्रावर सोमवारपासून विनामूल्य बूस्टर डोस

पुन्हा एकदा लसीकरणावर भर दिला जात आहे.

धारावीतल्या 'या' केंद्रावर सोमवारपासून विनामूल्य बूस्टर डोस
SHARES

मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या सर्व २४ वॉर्डना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच पुन्हा एकदा बूस्टर डोसवर भर दिला जात आहे.

लसीकरण मोहिमेचाच एक भाग म्हणून धारावीतील शास्त्रीनगर-२ इथल्या लसीकरण केंद्रावर २५ एप्रिलपासून १८ ते ५९ वर्ष वयोगटातील नागरिकांना विनामूल्य लस देण्यात येणार आहे. जसलोक रुग्णालया तर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

धारावीमधील पालिकेच्या शास्त्रीनगर - २ नागरी आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्र, एसएच-६, ट्रान्झिट कॅम्प, एम. जी. मार्गाजवळ, हुसेनिया मस्जीदच्या मागे, ९० फूट मार्ग, धारावी इथं २५ एप्रिलपासून कोरोना लस विनामूल्य देण्यात येणार आहे. 

मुंबईत आतापर्यंत १ कोटी ७ लाख २२ हजार १८४ नागरिकांचा पहिला डोस घेतला आहे. तर ९५ लाख ४४ हजार ३२८ नागरिकांनी दोन्ही डोसचा लाभ घेतला आहे.

दरम्यान, १० एप्रिलपासून कोरोनाचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं पालिकेतर्फे पुन्हा एकदा लसीकरण मोहिमेवर भर देण्यात येत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये राज्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेण्यास सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करत आरोग्य मंत्रालयानं याबाबत आवश्यक पाऊलं उचलण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय राज्यांनाही सतर्क राहण्याचा सूचना ही देण्यात आल्या आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोना संसर्गात सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि इतर काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण झपाट्यानं पाहायला मिळत आहे.

कोरोना संसर्ग वाढल्यामुळे याआधीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहित, आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या पत्रामध्ये कोरोना निर्बंध लागू करण्याच्या तसेच लसीकरावर अधिक भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.



हेही वाचा

मुंबईतील ९९ टक्के आरोग्यसेवा, फ्रंटलाईन वर्कर्समध्ये सर्वाधिक अँन्टिबॉडिज

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा