Advertisement

'या' वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या को-वॅक्सिनला आपत्कालीन मंजुरी

औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडिया (DCGI) च्या विषय तज्ञ समितीच्या (SEC) बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

'या' वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या को-वॅक्सिनला आपत्कालीन मंजुरी
(File Image)
SHARES

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI ने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला ६-१२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडिया (DCGI) च्या विषय तज्ञ समितीच्या (SEC) बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

२ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांना कोरोनाची लस कोवॅक्सिन देण्यासाठी भारत बायोटेककडून डेटा मागवण्यात आला होता.

सध्या १२-१४ वर्षे वयोगटातील मुलांना Corbevax ही लस दिली जात आहे. यावर्षी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यांना Co-vaxin चा डोस दिला जात आहे. त्यानंतर १६ मार्चपासून या मोहिमेचा विस्तार करण्यात आला. ज्यामध्ये १२-१४ वर्षांच्या मुलांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना कॉर्बेवॅक्स ही लस दिली जात आहे. अशाप्रकारे आता १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना देशात दोन कोरोना लसी मिळत आहेत.

शाळा सुरू झाल्यानंतर कोरोना प्रकरणात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन आठवड्यांत मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणे वाढली आहेत. त्याचवेळी, लसीला मंजुरी मिळाल्यानंतर, सरकार लवकरच एक मार्गदर्शक तत्त्व जारी करू शकते ज्यामध्ये हे लसीकरण देशात केव्हा आणि कसे सुरू करावं हे सांगितलं जाईल.



हेही वाचा

पाच वर्षांत मुंबई मलेरियामुक्त! पालिकेचे ‘मिशन ‘झीरो मलेरिया’

मास्क वापरासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा